जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा : एकवटलेल्या राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांची मोठी गर्दी…
सैनिकांच्या सन्मानार्थ उत्कट देशभक्तीचा झाला गजर...

सोलापूर : प्रतिनिधी
पहेलगाम येथे भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कट देशभक्तीचा गजर झाला. राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्यावतीने ही यात्रा काढण्यात आली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडेय उद्यान येथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सैनिकों के सन्मान में हर भारतीय मैदान में, भारतमाता की जय, वंदे मातरम, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय अशा घोषणा याप्रसंगी देण्यात येत होत्या. तसेच सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक घेऊन, तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारताच्या सैन्यदलाने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकांनी गाजविले. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत आता कोणातही राहिली नाही हे सिद्ध झाले आहे. हा पूर्वीचा भारत राहिला नसून मजबूत भारत आहे, हा संदेश जगभर गेला. सैन्यदलाचे मनोबल वाढवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, भारतीय सैनिकांच्या पराक्रमा पुढे पाकिस्तानने गुडघे टेकले. निष्पाप भारतीयांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांचा सूड सैनिकांनी घेतला. त्यामुळे संपूर्ण देशभरात समाधानाचे वातावरण आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. मार्कंडेय उद्यानापासून सुरुवात झालेली ही तिरंगा यात्रा अशोक चौक, बाजारपेठ, साईबाबा चौक, ७० फूट रस्ता मार्गे माधवनगर येथे पद्म मारुती देवस्थानसमोर विसर्जित झाली.
या तिरंगा यात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहर जिल्हाध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत, माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश महागावकर, प्रदेश महिला सचिवा रंजीता चाकोते, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, माजी नगरसेवक किसन जाधव, जगदीश पाटील, चन्नवीर चिट्टे, माजी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेविका कुमुद अंकारम, राधिका पोसा, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विठ्ठल कोटा, अनिल पल्ली, मेघनाथ येमुल, माजी सभागृहनेता व उपाध्यक्ष श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, आनंद बिर्रू, रवी कैय्यावाले, राजकुमार हंचाटे, रामदास मगर, डॉ. राजेश अनगिरे, काशिनाथ झाडबुके, शहर उपाध्यक्ष भूपती कमटम, जय साळुंखे, श्रीनिवास दायमा, चिटणीस सुनील गौडगाव, बजरंग कुलकर्णी, मंडल अध्यक्ष अक्षय अंजीखाने, नागेश सरगम, नागेश खरात, रवी कोळेकर, गणेश साळुंखे सत्यनारायण गुर्रम, राजमहिंद्र कमटम, ज्ञानेश्वर म्याकल, शशी थोरात, मोनिका कोठे, श्रीनिवास चिलका, राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, वैशाली गोली, अंबादास करगुळे, नागनाथ कासलोलकर, देवेंद्र भंडारे, जेम्स जंगम, व्यंकटेश कोंडी, सुनील पाताळे, अविनाश बेंजरपे, शिवकुमार कामाठी, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, अशोक संकलेचा, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिव दशरथ गोप, नाट्य परिषदेचे प्रशांत बडवे, विठ्ठल बडगंची, अशोक कटके, मल्लिनाथ याळगी, यशवंत पाथरुट, महेश बनसोडे, लेबर फेडरेशनचे शंकर चौगुले, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सुधीर बहिरवाडे, सकल हिंदू समाजाचे शिवराज गायकवाड, हिंदूराष्ट्र सेनेचे रवी गोणे, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवराम प्रतिष्ठानचे बापू वाडेकर, मारवाडी समाजाचे गोपाळ सोमाणी, सिंधी समाजाचे मोहन सचदेव, अल्पसंख्यांक सेलचे झाकीर सगरी, जाकीरहुसेन डोका, जैन प्रकाशचे ॲडवोकेट संगवे, जोशी समाजाचे युवराज सरवदे, सोलापूर विकास मंचचे केतन शहा, मोची समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे, भुसार अडत व्यापारी संघाचे सुरेश चिककळी, उद्योग आघाडीचे अंबादास बिंगी, श्री मार्कंडेय सोलापूर रुग्णालयाचे संचालक सुधाकर गुंडेली, अखिल भारतीय अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघम वेणूगोपाल जिल्हा पंतुलू, सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे दिलीप पतंगे, नगर अनुसूचित जाती मोर्चाचे मारेप्पा कंपली, शिक्षक आघाडीचे दत्ता पाटील, रमेश यन्नम, शेखर फंड,सावित्रा पल्लाटी, सिद्धेश्वर कमटम, अभिषेक चिंता, अंबादास सकीनाल, रवी भवानी, विश्वनाथ प्याटी, राजशेखर येमूल, बाबुराव शिरसागर, किरण भंडारे, मनोज कलशेट्टी, सुनील दाते, महेश अलकुंटे आदी सहभागी झाले होते.
——————-
चौकट
भारतमातेच्या मूर्तीने वेधले लक्ष
तिरंगा सन्मान यात्रेमध्ये भारतमातेची मूर्ती ठेवण्यात आली होती. तसेच कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. ऑपरेशन सिंदूर चा संदेश देणारी प्रतिमाही लावण्यात आली होती.
——————-
चौकट
तिरंगा झेंड्यांमुळे देशभक्तीचे वातावरण
तिरंगा सन्मान यात्रेत हजारो नागरिक तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. भारतमाता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा आणि तिरंगा झेंड्यांमुळे वातावरण देशभक्तीमय झाले होते.