उत्सव शिव जन्माचा स्वराज्य कार्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित शिवस्वराज्य सप्ताह….
शिव स्वराज सप्ताहाचे नियोजन नेमके कसे चला पाहू ?...

सोलापूर
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या. जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. ही बैठक शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. शिवजयंती निमित्त यंदाच्याही वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ज्यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिव स्वराज्य सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उदघाटन 19 फेब्रुवारी शिवछत्रपती रंगभवन येथून होणार आहे .
हा स्वराज्य सप्ताह 27 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. याच पार्श्भूमीवर नियोजनाची बैठक संपन्न झाली.
या स्वराज्य सप्ताह दरम्यान घेण्यात येणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे….
शिव स्वराज्य सप्तानिमित्त आज 18 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव व नागेश आण्णा गायकवाड यांच्या वतीने शिव व्याख्यान व रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ….
शिवस्वराज्य सप्ताहाची शुभारंभ 19 फेब्रुवारी रोजी सकाळी १०:१० मिनिटांनी शिवछत्रपती रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन महाआरतीने करण्यात येणार आहे. याप्रसंगी शिवछत्रपती स्वराज्य ध्वज फडकावून सेवादलच्या वतीने मानवंदना अध्यक्ष प्रकाश जाधव आणि सेवादल पदाधिकारी आणि शहर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार आहे.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून या शिव स्वराज्य सप्ताहाची सुरुवात केली जाईल…
शिवजयंती मनामनात घराघरात साजरी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या वतीने २१ मुर्तींचे वाटप दुपारी १२ वाजता सोनामाता नगर जुळे सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे….
20 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर रंगभवन चौक परिसर स्वच्छता अभियान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम व त्यांचे सर्व सहकारी – पदाधिकारी करणार आहेत.
युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची पुस्तके ५ ग्रंथालयांना भेट देण्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी आयोजित केला आहे…
21 फेब्रुवारी रोजी सोलापुरातील भुईकोट किल्ला याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी याकरता सहकार विभागाचे अध्यक्ष भास्कर आडकी यांनी विद्यार्थ्यांची सहल व गडदर्शन त्याचबरोबर मार्गदर्शन असा उपक्रम घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी सोलापूर भुईकोट किल्ल्याची स्वच्छता अभियान राबवणार आहेत…
22 तलवार बाजी दांडपट्टा लाटीकाटी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक आणि स्पर्धेचे आयोजन उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले कार्याध्यक्ष मनोज शेरला मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादीराजे कार्याध्यक्ष विकास हिरेमठ दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रमोद बाळशंकर वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोळी यांनी आयोजित केले
फेब्रुवारी रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवचरित्र चित्रकला व रयतेचे राज्य शिवरायांच या विषयावर
निबंध लेखन स्पर्धेचा आयोजन ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद आणि आयुबशेख यांनी कैले ..
MPSC व महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत नाविन्यपूर्ण यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात येणारअसून याचे आयोजन सोशल मिडीया अध्यक्ष वैभव गंगणे यांनी केले आहे ..
23 फेब्रुवारी रोजी शिवस्वराज्य सप्तानिमित्ताने तसेच संत गाडगे महाराज जयंतीचे अवचित्य साधून सफाई कामगारांचा सन्मान , रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर डॉक्टर सेलचे अध्यक्ष महेश वसगडेकर यांनी आयोजित केले आहे.त्याच बरोबर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिला आघाडीचे अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबवले आहे .
24 फेब्रुवारी रोजी रयतेच राज्य शिवरायांचे या विषयावर निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले यांनी आयोजित केला असून तसेच रांगोळी व निबंध लेखन स्पर्धा प्रज्ञासागर गायकवाड यांनी आयोजित केला आहे…
2५ फेब्रुवारी रोजी शिवस्वराज्य सप्ताह महाआरोग्य शिबिर डॉक्टर विभागाचे अध्यक्ष महेश वसगडेकर यांनी आयोजित केला आहे.तसेच शालेय साहित्य वाटप कार्यक्रम अशपाक कुरेशी यांनी
आयोजित केला आहे.
26 फेब्रुवारी रोजी सबका राजा शिवाजी राजा या विषयावर व्याख्यान अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अमीर शेख यांनी आयोजन केले आहे.
27 फेब्रुवारी रोजी शिवस्वराज्य सप्ताह निमित्ताने तसेच मराठी भाषा दिनानिमित्त मराठी साहित्यिक व इतिहासकार यांचा सत्कार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर च्या वतीने करण्यात येणार आहे.
शिव स्वराज्य सप्ताह निमित्त 20 ते 27 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान मुलींना सेल्फ डिफेन्स व कराटे कार्यशाळा युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांच्या वतीने आयोजित घेण्यात येणार आहे…
महिला आघाडी मध्य अध्यक्ष अर्चना दुलंगे यांच्या वतीने निबंध लेखन स्पर्धेचे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे
जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, अनिल उकरंडे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, समन्वयक दत्तात्रय बडगंची, युवक महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश कुलकर्णी, युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख,VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले, सहकार विभाग एम सेल अध्यक्ष भास्कर आडकी, OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद, आयुब शेख , डॉक्टर सेल विभाग अध्यक्ष महेश वसगडेकर, शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे, उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी , सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादिराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर,सायबन्ना हनुमला, दत्तात्रय बनसोडे , अल्पसंख्यांक उत्तर अध्यक्ष नवाज हुंडेकरी दक्षिण अध्यक्ष अशपाक कुरेशी,दक्षिण पक्ष संघटक झहीर शेख, शहर उपाध्यक्ष इस्माईल शेख , अल्पसंख्याक विभाग दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी ॲड .अमोल कोटीवाले, अनिकेत व्हसुरे , महिला आघाडी पदाधिकारी अर्चना दुलंगे , सुरेखा घाडगे उमादेवी झाडबुके ,राजश्री पारशेट्टी निता डमामी यांच्या सह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त तमाम शिवप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…
तमाम शिवप्रेमींनी पाळणा सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…
आयोजक :- ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर {नाना} काळे
उत्सवा अध्यक्ष ca सुशील बंदपट्टे
व समस्त श्री शिवजन्मोत्स मध्यवर्ती महामंडळ सोलापूर