maharashtrapoliticalsocialsolapur

परभणी येथील घटनेचे पुढे काय झाले? भीमशक्तीची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी…

 

सोलापूर

प्रतिनिधी

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाची हत्या झाली. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन एक महिना उलटला परंतु तपास थंड आहे.त्या घटनेचे पुढे काय झाले? असा प्रश्न करत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन गुरुवारी भीमशक्ती सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले.
या संपूर्ण प्रकरणाची कलम १७६ अन्वये तातडीने चौकशी करावी. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व इतर पोलीस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्यांनानोकरीतून बडतर्फ करावे .सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना सरकारने५० लाखाची आर्थिक मदत द्यावी. घरातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. सामाजिक कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांनाही सरकारने तातडीने २५ लाखाची आर्थिक मदत द्यावी. व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे. वच्छालाबाई मानवते या महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसावर ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्यास निलंबित करावे. तसेच मानवते कुटुंबीयांना १० लाखाची आर्थिक मदत द्यावी. पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर कोंमबिग कारवाईत नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी. सर्व घरांचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच जखमीनाही आर्थिक मदत द्यावी. संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या दत्ता सोपान पवार यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कोंबिंग ऑपरेशन मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत. अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले असून आठ दिवसात दखल न घेतल्यास संघटना संविधानिक मार्गाने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. या पत्रकावर प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ कदम, शहराध्यक्ष उमेश सुरते ,जिल्हा महिला अध्यक्ष प्रमिला तूपलोंढे, शहराध्यक्ष ज्योती गायकवाड, शहर कार्याध्यक्ष अड. कमरुनिसा बागवान ,नसरीन शेख, सलीम मुल्ला ,इब्राहिम शेख, मेजर सुखदेव साबळे, के एम कांबळे, विक्रम वाघमारे ,प्रकाश बनसोडे, समीर मुजावर, मयूर तळभंडारे ,रफिक शेख, मुमताज तांबोळी ,भारत क्षीरसागर. आधी पदाधिकारी उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button