maharashtrapoliticalsocialsolapur

संजय रुपनर यांच्या डिनर डिप्लोमसीच्या धर्तीवर फराळ डिप्लोमसी निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा विषय…

सोलापूर

हद्दवाढ भागामध्ये कायम एक चर्चेतील नाव गोपनीय गाईडचे संपादक संजय रुपनर हे येणाऱ्या काळात हद्दवाढ भागात OBC मतदारसंघातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याची दाट शक्यता सूत्रांकडून प्राप्त झाले आहे. त्यांचे लागेबंध अनेक दिग्गज वरिष्ठ नेत्यांशी आहेत.जुळे सोलापुरातील स्थानिक पातळी ते राज्यस्तरीय नेत्यांसोबत त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. जुळे सोलापूर भागातील काही इच्छुक उमेदवार या सर्व उमेदवारांची कुंडली रुपनर यांच्याकडे आहे.

 

आजतागायत त्यांनी गोपनीय गाईडच्या माध्यमातून राजकीय वर्तुळातील सर्व नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. त्याचाच एक धागा पकडून वरिष्ठ नेत्याने सोमपा प्रभाग क्रमांक 24 मध्ये OBC मतदार संघातून जांगडगुत्ता सोडवण्यासाठी ऐनवेळी त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात येईल असे त्यांना वरिष्ठांनी सांगितले आहे.ते धनगर समाजाचे असल्याकारणाने भविष्यात त्या नेत्याला रुपनर यांचा फायदा होणार आहे.

रुपनर यांच्याकडे अनेक बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वांचा सद्यस्थितीत गोतावळा आहे. सर्वधर्मसमभाव अशी त्यांची विशेष भूमिका राहिली आहे. काही राजकीय नेते त्यांच्या सल्ल्याशिवाय व मार्गदर्शनाशिवाय पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करत नाहीत.

डिनर डिप्लोमसीच्या धर्तीवर फराळ डिप्लोमसी हा त्याचाच एक भाग म्हणून लवकरच जुळे सोलापूर भागात नवा राजकीय अध्याय संजय रुपनर यांच्या रूपात पाहायला मिळणार आहे. हद्दवाढ भागातील सर्वच राजकीय मंडळींनी आज त्यांच्या फराळ डिप्लोमसीला उपस्थिती दर्शवून त्यांना दिवाळी शुभेच्छा दिल्या…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia