रेशन दुकानदारांच्या कमिशन वाढी साठी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष सह सोलापूर जिल्हा संघटनेने घातले सोलापूर पालकमत्र्यांना साकडे…

ऑल महाराष्ट्र फेयर प्राईस शॉप किपर्स फेडरेशन पुणे व स्वस्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानधारक महासंघ पुणे यांच्या संयुक्तपणे महाराष्ट्रातील 52 हजार रास्त भाव धान्य दुकानदार हे शासनाने दिलेल्या वेळोवेळी आदेशाचे पालन करते,धान्य तसेच आनंदाचा शिधा वाटप,असे शासनाचे अनेक लोकाभिमुख उपक्रम सर्व कामे वेळेवर करत असते. तसेंच शासनाचे आधार सिडिंग, ekyc करणे, आयुष्मान कार्ड तयार करणे,मोबाईल सिडींग असे विना मोबदला कामे वेळेत करून देत आहे. रेशन दुकानदारांना दैनंदिन जीवनात शासनाने दिलेले काम करत असताना रेशन दुकानदाराचे अडीअडचणी पैकी प्रामुख्याने सन 2017 पासून रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल 150 रुपये इतके अत्यल्प कमिशन आहे. ते आज चालू महागाईच्या हिशोबाने नव्याने कमिशन वाढ करून मिळावे.
तसेच सोलापूर जिल्हा ग्रामीण भाग व पुणे शहर व जिल्ह्यामध्ये वाहतूक ठेकेदारां मार्फत वेळेत धान्य मिळत नाही. काही दुकानदारांना महिना अखेरिस धान्य मिळाल्याने धान्य वाटपास दुकानदाराला शेवटच्या 2 ते 3 दिवसात धान्य वाटप करणे अडचणीचे ठरत आहे.
त्यामुळे बहुतांश कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहे.ज्या जिल्हात व तालुका मध्ये उशिरा धान्य मिळत आहे.त्या ठिकाणी दुकानदारांना धान्य वाटपास मुदत वाढ देण्यात यावे.यापूर्वीही रेशन दुकानदारांचे दोन्ही संघटनेच्या वतीने बरेच निवेदन शासन व प्रशासन दरबारी मांडण्यात आले आहेत व वेळोवेळी आंदोलन ही पुकारले आहेत.अनके वेळा शासना कडून कमिशन वाढी बाबत आश्वासन दिले गेले होते.सोलापूर पालकमंत्री ह्यांनी महाराष्ट्र राज्य फेडरेशन व महासंघाच्या संयुक्त बैठक हे देवेंद्रजी फडवणीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी बैठक घडवून दुकानदाराविषयीं सकारात्मक भूमिका मांडून कमिशन वाढ होणे बाबत प्रयत्न करावे.असे निवेदनात म्हटले आहे.
ह्यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर,डॉ. रवींद्र मोरे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,श्रीकांत शेटे सातारा जिल्हाध्यक्ष,सोमनाथ वचकल पुणे जिल्हाध्यक्ष,दिपक उपाध्ये सांगली जिल्हाध्यक्ष,विजय गुप्ता राज्य खजिनदार, गणेश डांगी पुणे अध्यक्ष,रमेश शर्मा पुणे अध्यक्ष, अशोक पाटिल सातारा जिल्हाध्यक्ष,
नितीन पेंटर संपर्कप्रमुख,वहाब शेख उपाध्यक्ष,अभिजित सड्डू उपाध्यक्ष,सोलापूर आदी उपस्थित होते.