crimemaharashtrapoliticalsocialsolapur

बोरामनी येथील तिहेरी खून प्रकरणी आरोपी नं.1 यास 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर आरोपी नं.2 ते 6 यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

 

 

सोलापूर

 

 

बोरामनी येथील शेतीच्या वादातून व पैशाच्या कारणावरून झालेल्या तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर ऊर्फ पपु दत्तात्रय मस्के यास सहा दिवसाची तर राणी शंकर मस्के, दीक्षा शंकर मस्के, धीरज शंकर मस्के, सचिन शिवाजी वाघमारे व सूरज महादेव मोरे यांना तीन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट (ऐश्वर्या जाधव) यांनी दिले.
यात हकिकत अशी की, मुख्य आरोपी शंकर मस्के याचा भाऊ सुधाकर मस्के हा सुमारे 5 वर्षापुर्वी मयत झाला आहे तद्नंतर शंकर मस्के व त्याचा भाऊ सुधाकर मस्के याची पत्नी गायत्री यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमीन वाटणी वरुण वाद सुरू होता. त्यामुळे शंकर हा गायत्री हिच्या वर चिडून होता व तसेच गायत्रीच्या पतीने पूर्वी जमीन विकली होती त्या शेतजमीन विक्रीतून त्यांना मिळालेल्या रकमेतिल 25 लाख रुपये गायत्रीने दीर शंकर मस्के यास हातउसने रक्कम दिली होती ती रक्कम गायत्री ही शंकर यास मागणी करीत होती.

 

 

 

 

त्यावेळी शंकर हा तिला घेतलेले पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत होता फिर्यादी हा अधून मधून गायत्री हिच्याकडे येत जात होता त्यावेळी याबाबत गायत्रीने फिर्यादीस सांगितले होते. दि.2/5/26 रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा गावात असताना त्याच्या गावातील पिंटू जाधव याने सांगितले की, तुझी बहीण गायत्री व तिचे दोन्ही मुलांना कोणीतरी ठार मारले आहे, तूला काय माहिती मिळाली आहे काय, तू खात्री करून घे त्यामुळे फिर्यादीने गायत्री हिच्या मोबाईल वर फोन केला असता तिचा मोबाईल बंद लागत होता त्यामुळे शंकर मस्के यास फोन केला असता त्याचा देखील फोन बंद लागत होता त्यानंतर फिर्यादीने त्याच्या मावस भावाला फोन लावून विचारणा केली असता त्याने खरे असल्याचे सांगितले त्यामुळे फिर्यादी हा त्वरित सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे आला असता त्यास चर्चेतून असे समजले की, शंकर ऊर्फ पपु मस्के याने त्याची बहीण गायत्री, भाची प्रियांका व भाचा शिवराज यांना तलवारीने गंभीर जखमी करून जीवे ठार मारले असल्याची फिर्याद दिलीप विश्वनाथ चांदोरे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

 

यात आरोपी शंकर मस्के, राणी मस्के, दीक्षा मस्के, धीरज मस्के, सूरज मोरे व सचिन वाघमारे यांना प्रस्तुत गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी मुख्य आरोपी शंकर मस्के यास आज प्रथमच न्यायालयात हजर केले असता त्यास सहा दिवसाची तर ईतर आरोपींना तीन दिवसाची वाढीव पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
यात आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष न्हावकर, अ‍ॅड. राहुल रूपनर, अ‍ॅड. चैतन्य नल्ला, सरकार‍ पक्षातर्फे अ‍ॅड. संतोष पाटील यांनी काम पाहिले.
,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia