crimemaharashtrapoliticalsocialsolapur

लाचलुचपत प्रकरणात ऑपरेटरविरुद्ध गुन्हा; एसीबीची सापळा कारवाई यशस्वी

सोलापूर, दि. ०८ (प्रतिनिधी)

 

 

 

शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ठोस कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

 

 

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर युनिटकडे एका नागरिकाने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपी विनोद विजय गायकवाड (वय ३९, रा. उपळाई, ता. माढा, जि. सोलापूर) हा ऑपरेटर म्हणून कार्यरत असून, त्याने संबंधित शासकीय काम मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला १२०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तडजोडीअंती ५०० रुपयांवर व्यवहार निश्चित केला.

 

 

 

 

तक्रार प्राप्त होताच एसीबीने प्राथमिक पडताळणी सुरू केली. दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीकडून लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबी पथकाने दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचला. नियोजनाप्रमाणे तक्रारदाराने आरोपीला ५०० रुपये देताच पथकाने तत्काळ छापा टाकून आरोपीला रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक श्री. अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत बोंडगे, तसेच एसीबी सोलापूरच्या पथकातील इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

 

 

चौकट –दरम्यान, एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी लाच मागितल्यास घाबरू नये आणि तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळे अशा प्रकारच्या भ्रष्टाचारावर प्रभावी आळा बसू शकतो, असेही विभागाने नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia