maharashtrapoliticalsocialsolapur

शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाची बैठक उत्साहात संपन्न…

 

सोलापूर

शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस शिव-शंभू भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

या वेळी २०२६ सालच्या जयंती उत्सवासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी रोहित नलवडे यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी करण मोरे व दिपक डोंगरे, कार्याध्यक्षपदी समर्थ बिराजदार, तर नियोजन प्रमुखपदी वीरेश कलशेट्टी यांची निवड करण्यात आली.

 

 

उत्सव नियोजनासंदर्भात बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मिरवणुकीत ‘१ बेस, १ टॉप क्लीन साऊंड’ वापरण्याचे आवाहन करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने ज्यांना मिरवणूक काढाची आहे त्यांनी पारंपारिक काढावी,तसेच पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

 

 

मध्यवर्ती महामंडळ संस्थापक राम जाधव यांनी “१८ पगड जातींचे शिव-शंभू भक्त एकत्र येऊन जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करूया. मध्यवर्ती महामंडळ प्रत्येक मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे मनोगत व्यक्त केले.

 

 

यावेळी सोमनाथ राऊत, श्याम कदम, मल्लू सलगर यांनीही आपले विचार मांडले. बैठकीस राजाभाऊ आलुरे, बंटी रोडगे, विक्रांत जाधव, महेश जगदाळे, पंकज काटकर, गणेश कदम, अमोल झाडगे, निलेश शिंदे तसेच विश्वस्त अभिजीत बंटी सोनके, निशांत सावळे, राहुल दहिहंडे, अजिंक्य पाटील, हरिभाऊ सावंत, राजाभाऊ गेजगे, पवन आलुरे, संदीप चेळेकर, नागेश भोसले, सूरज पाटील, राज पवार, राज शिंदे, अजय देवकर, अजिंक्य शिंदे, सोहम शेळके आदींसह असंख्य शिव-शंभू भक्त उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button