हत्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून निवडणूक विजयाचा साधेपणाने आनंदोत्सव
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नपूर्तीकडे भाजपाची वाटचाल : रोहिणी तडवळकर

सोलापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे झालेली निष्पाप बालिकेची हत्या आणि सोलापूर शहर जिल्ह्यात विविध घटनांमध्ये झालेल्या खूनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सोमवारी पश्चिम बंगाल, आसामसह विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाचा आनंद अत्यंत साधेपणाने साजरा केला.
भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालयासमोर भाजपाचा ध्वज फडकावून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, पश्चिम बंगालची जनता संकटाच्या कचाट्यातून सुटली आहे. भाजपाचा विजय म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. संपूर्ण देशात भाजपाची सत्ता यावी हे शामाप्रसाद मुखर्जींचे स्वप्न साकार करण्याकडे भाजपची वाटचाल होत आहे. नसरापूर येथील निष्पाप बालिकेच्या हत्येची तसेच शहर जिल्ह्यात झालेल्या सहा हत्यांच्या प्रकरणाची जाणीव ठेवून भारतीय जनता पार्टीने ढोल, ताशे, मिठाई अशा स्वरूपाचा आनंदोत्सव न करता अत्यंत साधेपणाने एकमेकांना अभिनंदन करून आनंद साजरा केला आहे.
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, भारतातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे. याचे प्रत्यंतर या विधानसभा निवडणुकांच्या निकालाने पुन्हा एकदा आलेले आहे. भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार विकासाच्या शिखरावर नेईल, असा विश्वास सर्व जनतेला आहे. हाच विश्वास या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट झाला आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल याप्रसंगी म्हणाले.

यावेळी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, रामचंद्र जन्नू, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, भाजपाचे सरचिटणीस डॉ. शिवराज सरतापे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महेश देवकर, शहर चिटणीस रवी भवानी, बजरंग कुलकर्णी, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, राजकुमार पाटील, भरतसिंग बडूरवाले, बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, सात्विक बडवे, रवी कैय्यावाले, ऋषिकेश मेट्रे, मेघनाथ येमुल, नागनाथ कासलोलकर, संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे, मंदाकिनी तोडकरी, विजया वड्डेपल्ली, दीपिका यलदंडी, सत्यनारायण गुर्रम, गौतम कसबे, रुद्रेश बोरामणी, जाकीर सगरी, शिरीष गायकवाड, विजय महिंद्रकर, राजश्री दोडमणी, श्वेता खरात, मृण्मयी गवळी, बसवराज केंगनाळकर, जकप्पा कांबळे, कविता गज्जम, सतीश महाले, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजू हिबारे, अल्पसंख्यांक महामंत्री आदम शेख, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत खंडेलवाल, विश्वनाथ प्याटी, विजय धोत्रे, ओंकार होमकर आदी उपस्थित होते.
———
चौकट
मृतांना वाहिली श्रद्धांजली
नसरापूर येथील बळी पडलेल्या निष्पाप बालिकेला तसेच शहर जिल्ह्यात झालेल्या खुनांच्या घटनातील मृतांना यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक मिनिट मौन राहून श्रद्धांजली वाहिली.



