maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर महापालिकेत शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे, काँग्रेस गटनेतेपदी चेतन नरोटे यांची निवड

सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे तर काँग्रेसच्या गटनेतेपदी चेतन नरोटे यांची अधिकृत निवड करण्यात आली. ही निवड पुणे महानगरपालिकेचे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.महानगरपालिकेतील आगामी कामकाज, प्रशासकीय निर्णय आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. नव्याने निवड झालेल्या गटनेत्यांकडून शहराच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रभावी भूमिका बजावली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

या निवड प्रक्रियेदरम्यान नगरसेवक अनिकेत पिसे, नगरसेवक प्रियदर्शन साठे तसेच नगरसेविका मनोरमा सपाटे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या गटनेत्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

 

सोलापूर महानगरपालिकेत सत्ताधारी व विरोधी गटांच्या दृष्टीने ही निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत असून, आगामी काळात शहराच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia