politicalmaharashtrasocialsolapur

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ : सकाळी ११.३० वाजेपर्यंत १८.०८ टक्के मतदान

सोलापूर

 

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत आज शहरात शांतता व सुव्यवस्थेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत शहरातील एकूण १८.०८ टक्के मतदान झाले असल्याची अधिकृत माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील विविध प्रभागांतील मतदान केंद्रांना भेट देत बूथ यंत्रणेची पाहणी केली. यावेळी मतदान कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था, मतदारांसाठी करण्यात आलेल्या सुविधा यांचा त्यांनी आढावा घेतला.

 

मतदान केंद्रांवर पुरेशी पोलीस बंदोबस्त व्यवस्था ठेवण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर कायम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa