crimeindia- worldmaharashtrapoliticalsocial

खून , दरोडा, खंडणी प्रकरणात प्रथमेश ढेरेला अटक…

सोलापूर, प्रतिनिधी

मिरज शहरातील निखील विलास कलगुटगी खून प्रकरणात संघटित गुन्हेगारीला मोठा धक्का देत सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांनी १५ आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावण्यास मंजुरी दिली आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी टोळीने सन २०१७ ते २०२५ या कालावधीत सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रथमेश सुरेश ढेरे (वय २५, रा. मिरज) हा टोळीप्रमुख असून त्याच्यासह एकूण १५ जणांनी मिरज शहर परिसरात संघटित गुन्हेगारी टोळी उभी केली होती.

 

 

 

 

खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आर्थिक फायद्यासाठी व वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या टोळीने हिंसाचाराचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याकडून अभिप्राय घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी मोक्का प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रस्तावाचे परीक्षण करून तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला.

 

 

 

 

अखेर संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्याच्या उद्देशाने मोक्काअंतर्गत कारवाईस मंजुरी देण्यात आली. चालू सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील (विटा उपविभाग) करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia