solapur

अँड राजेश कांबळे खून खटला ! एकची महत्त्वपूर्ण साक्ष…

.

 

सोलापूर :- ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी *जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांच्यासमोर सुरू झाली.

 

 

आज रोजी *साक्षीदार पो.का.हरीश पवार* यांनी आपले साक्षीत दिनांक 17/0 6 /2019 रोजी गुन्ह्यातील जप्त मुद्देमालचे एकूण 26 सीलबंद पाकीट हे तपासणी साठी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे दिले व दिलेबाबत पोहोच घेतली.अशी महत्वपूर्ण साक्ष नोंदवली.

 

त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.

तर खटल्यास पुढील सुनावणी ही दिनांक 28/01/2026 ही तारीख नेमली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 स्वतः आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button