“स्व. शंकर शिवप्पा मस्कले स्मृती चषक” जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा…
खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

सोलापूर
ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने “स्व. शंकर शिवप्पा मस्कले स्मृती चषक” यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या खुल्या, १६, १२ व ८ वर्षाखालील गटात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ३४ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापुर शहरासह करमाळा, पंढरपुर, द. सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा आदी तालुक्यातील २५० खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन प्रायोजीका श्रीमती कस्तुराबाई शंकर मस्कले व ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे विद्या मस्कले यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे सचिव गणेश मस्कले, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील, सरस्वती झंपले, शकुंतला माने, दिगंबर मस्के, महादेव भोसले, उज्वला नाईकवाडे तसेच सर्व पदाधिकारी, पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या मनोगतात सचिव गणेश मस्कले यांनी दरवर्षी बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचे जाहीर करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील तर प्रास्ताविक सुमुख गायकवाड यांनी केले.
सात रस्ता येथील इरण्णा उपलप मंगल कार्यालय येथे रंगलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड, विशाल पटवर्धन, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसरगीकर, बार्शीचा शंकर साळुंके, स्वप्नील हदगळ, अकलूजचा उन्मेष राऊत, दत्तात्रय गोरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धी उपासे, स्वराली हातवळणे, सृष्टी गायकवाड, सान्वी गोरे, सृष्टी मुसळे या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंनी विजयी सलामी दिली. तर १६ वर्षाखालील गटात मानांकित आदिनाथ हावळे, सानिध्य जमादार, रणवीर पवार, १२ वर्षाखालील गटात विवान दासरी, श्रेयस इंगळे, विवान कोंगारी, आयुष गायकवाड तसेच ८ वर्षाखालील गटात नमन रंगरेज, नियान कंदिकटला यांनी आकर्षक विजय मिळवीले. तसेच नागेश राजमाने, पृथ्वीराज मुकाने, स्वराली जाधव या उदयोन्मुख खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे तर सहाय्यक वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, प्रज्वल कोरे, पृथ्वीराज देशमुख, भरत वडीशेरला, गौरव माने, अभिषेक राठोड आदी काम पाहत आहेत.
फोटो ओळी: “स्व. शंकर शिवप्पा मस्कले स्मृती चषक” जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना श्रीमती कस्तुराबाई शंकर मस्कले व ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे विद्या मस्कले. सुमुख गायकवाड, गणेश मस्कले, अतुल कुलकर्णी, संतोष पाटील, उदय वगरे, रोहिणी तुम्मा, दिगंबर मस्के, विद्या मस्कले, सरस्वती झंपले, शकुंतला माने, आदी पदाधिकारी



