solapur

जलद गतीने खटला ! राजेश कांबळे खून खटला :- सोलापूरच्या इतिहासात प्रथमच सुट्टी दिवशी खटल्याची सुनावणी….

 

तिघांची महत्त्वपूर्ण साक्ष

सोलापूर .

 

 

ॲड. राजेश श्रीमंत कांबळे वय 45 राहणार 43, ब्रह्मचैतन्य नगर नवीन आर. टी. ओ. सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी आरोपी संजय उर्फ बंटी महादेव खरटमल, अँड सुरेश तारू चव्हाण व श्रीनिवास महांकाळी येलदी यांच्यावर भरलेल्या खटल्याच्या सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते* यांच्यासमोर सुरू झाली.

 

 

आज रोजी फिर्यादी साक्षीदार मिलिंद श्रीमंत कांबळे* यांनी आपले साक्षीत मयत ॲड राजेश हा त्यांचा भाऊ होता दिनांक 08/ 06 /2019 रोजी दुपारी राजेश घरी नव्हता म्हणून त्याची पत्नी अस्मिता हिचे कडे विचारणा केली असता राजेश यास फोन केला असता तो एका केस संदर्भात बंटी नावाच्या इसमाच्या घरी आहे व तो काम उरकून संध्याकाळी पाच वाजता घरी येतो म्हणून सांगितलेला आहे. असे सांगितले परंतु तो घरी परत आला नसल्याने त्याचा शोधा शोध घेतला. तो मिळून आला नाही.

 

 

 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 09/ 06/ 2019 रोजी पहाटे साडेपाच वाजता त्याची गाडी कोर्टात आहे का हे पाहण्यासाठी कोर्टात गेले असता गाडी मिळून आली नाही. त्यानंतर फिर्यादी स्वतः व त्याचे वडील यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दाखल केली.
त्यानंतर दिनांक १०/०६/२०१९ रोजी मयत ॲड राजेश हा कोर्टात बाहेर ज्या ठिकाणी टायपिंग करायचा तेथील टायपिस्ट शंकर सुरवसे याला फिर्यादीने फोन केला असता त्याने सांगितले की मागील आठवड्यात राजेश हा दुकानात बसला असता आरोपी बंटी हा तेथे आला होता व त्याने राजेश यास म्हणले की तुम्हाला मोठी केस द्यायचे परंतु ती व्यक्ती वयोवृद्ध असल्याने आपणास त्याची भेट घ्यायला जावे लागेल असे सांगितले.
त्यानंतर ते बंटी याच्या घरी गेले असता त्याच्या घरास कुलूप होते व तो अश्विनी हॉस्पिटल जेथे काम करीत होता तेथे जाऊन चौकशी केली असता तो एक महिन्यापासून कामावर नसल्याचे त्यांना समजले .

 

 

 

त्यावरून त्यांचा बंटी खरटमल विरुद्ध संशय बळावला व दिनांक 12/06 /2019 रोजी त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे जाऊन बंटी याच्यावर संशय असल्याचे सांगितले. त्यावर त्यावर ते व पोलीस हे बंटी याच्या घरी गेले असता घरातून दुर्गंधी येत असल्याने दोन पंचांसमक्ष दरवाजा चे कुलूप तोडले तोडून आत मध्ये प्रवेश केला असता तेथे दोन पोती होती एका पोत्यात धड तर दुसऱ्या पोत्यात दोन हात ,दोन पाय व मुंडके होते. प्रेताच्या ठेवणीवरून त्यांनी घातलेल्या कपड्यांवरून व प्रेताच्या शर्टाच्या कॉलरला झूप टेलरचे लेबल लावलेले होते त्यावरून फिर्यादीने ते प्रेत त्याचा भाऊ ॲड राजेश कांबळे यांचे असल्याचे सांगितले. तसेच तेथे कोयता, सत्तुर व हातोडा हे घटनास्थळी पडलेले होते.

 

 

 

तसेच त्याच्या अंगावरील दोन सोन्याच्या चैन, दोन सोन्याच्याअंगठ्या व एक चांदीची अंगठी ही दिसून आले नाही. त्याबाबत दिनांक 12/06 /2019 रोजी वरील आशियाची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाणे येथे नोंदणी अशा आशयाची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली.

तदनंतरचा साक्षीदार पो.ना समीर मुजावर यांनी आपले साक्षीत दिनांक 28 6 2019 रोजी गुन्ह्यातील जप्त हत्यारे हे तपासणी साठी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे दिले व हत्यार दिलेबाबत पोहोच घेतली.अशी महत्वपूर्ण साक्ष नोंदवली.

त्यानंतरचा तिसरा साक्षीदार पो का गणेश कानडे* यांनी आपले साक्षीत दिनांक 17/ 06 /2019 रोजी मयताचा व्हिसेरा तपासणी साठी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे येथे दिले व व्हिसेरा दिलेबाबत पोहोच घेतली.अशी महत्वपूर्ण साक्ष नोंदवली.

त्यावर आरोपींच्या वकिलांनी घेतलेल्या उलट तपासास साक्षीदारांनी नकारात्मक उत्तरे दिली.

तर खटल्यास पुढील सुनावणी ही दिनांक 22/12/2025 ही तारीख नेमली.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अँड. उज्वल निकम, मूळ फिर्यादीतर्फे अँड.मिलिंद थोबडे अँड.विनोद सूर्यवंशी तर आरोपी नंबर 1 तर्फे अँड राजेंद्र फताटे, आरोपी नंबर 2 स्वतः आरोपी नंबर ३ तर्फे अँड जयदिप माने हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button