एस.टी.स्टँड येथे गदींचा फायदा घेवून प्रवासी महिलेचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस दोन तासात अटक फौजदार चावडी पोलीस ठाण्याची कामगिरी…

सोलापूर
दिनांक १६/१२/२०२५ रोजी प्रवाशी महिला नाव सिंधु भारत डोईफोडे वय ६० वर्षे, रा.मु.पो. हिरेमठ हॉस्पीटल जवळ, रिंग रोड, बाशी, जि. सोलापूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे येवून वयोवृध्द महिलने गहिवरलेल्या अवस्थेत माहीती दिली की, त्या दि.१६/१२/२०२५ रोजी दुपारी मी व माझ्या मैत्रीणी रत्नमाला हिरे, व शोभा हिरे रा.बाशी जि. सोलापूर असे अक्कलकोट येथून देव दर्शन करुन अक्कलकोट ते सोलापूर गाडीत बसून सोलापूर एस.टी. स्टॅन्ड येथे दुपारी ०४.०० वा.चे सुमारास उतरुन आम्ही तिधी दहा पंधरा मिनीट सोलापूर एस.टी स्टॅन्ड येथे थांबलो. त्यानंतर सोलापूर एस टी. स्टॅन्ड येथे वाशीला जाणारे बस फलाटवर बस आल्याने आम्ही तिघी बसमध्ये चढत असताना मला माझ्या गळयातील मणी मंगळसुत्र कोणीतरी खेचल्यासारखे जाणवले म्हणून मी मागे वळून पाहिले असता एक अंदाजे ४५ ते ५० वर्षे वयाची महिला जिने अंगात एक करडया रंगाची साडी घातलेली एक महिला माझ्या गळयातील मणी मंगळसूत्र घेवून जाताना दिसली. त्यावेळी आम्हो तिच्या मागे जात असताना आम्ही गदीतुन बाहेर येईपर्यंत ती तेथुन गडबडीने निघुन गेली. सदर महिलेचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. या मानसीक धक्यात सदर बाब हि त्यांनी त्यांचे पती व मुलगा यांना सागितली. त्यावेळी त्यांचे पती व मुलांने त्यांना पोलीसांबाबत विश्वास दाखवुन त्यांना धीर दिला व तक्रार देण्यासाठी जा असे सांगीतले. लागलीच त्यांनी दिनांक १६/११/२०२५ रोजी त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे पोलीसांना माहीती दिली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी तक्रारदार यांनी माहीती देताच त्यांनी संवेदनशिलता व कार्यतत्परता दाखवुन सदर वयोवृध्द महिलेस धीर देवुन त्यांची तक्रार तात्काळ नोंदवून घेवुन त्याप्रमाणे फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.क्र.९३३/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षिरसागर यांना पथकासोबत सदर गुन्हयातील आरोपीत याचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले.

आरोपी महिला
त्याचप्रमाणे या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व त्यांचे पथकाने तात्काळ सदर आरोपीत महिलेचा तात्काळ शोध सुरु केला शोध घेत असता दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ” एक अंदाजे ६० वर्ष वयाचो महिला जिने अंगात एक करडया रंगाची साडी घातलेली आहे. ती सोलापूर एस.टी. स्टॅन्ड येथे फिरत आहे.” अशी खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारा मार्फत प्राप्त झाली. त्याअनुषंगाने सदर बातमीची योग्य ती खात्री व शहानिशा करून सदर ठिकाणी जावुन ही महिला आरोपीतास पोलीसांनी तक्रार प्राप्त झाल्यापासुन दोन तासातच ताब्यात घेतले व तिचे नांव पत्ता विचारले असत्ता तिने आपले नाव-महानंदा राम राठोड वय ५० वर्ष, रा.मु. कानडे पिपळगांव, पोस्ट, हिरापुर ता. गेवराई जि.बीड असे सांगीतले, सदर महिला आरोपतीताकडे महिला पोलीसांमार्फत कसून चौकशी करता तीने गुन्हा केल्याची कबुली दिली व तिचेकडून चोरीचे सोन्याचे मणीमंगळसुत्र जप्त करण्यात आले. प्रवाशी महिला नामे सी. सिंधु भारत डोईफोडे यांना या बाबत पोलीसांनी तात्काळ माहीती देताच नमुद वयोवृध्द महिला प्रवाशी यांचे अश्रू अनावर झाले व त्यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.
तसेच सिध्दरामेश्वर यात्रा व सोलापूर महानगरपालीका निवडणूक २०२५-२०२६ च्या अनुषंगाने सोलापुर आयुक्तलयात, फौजदार चावडी पोलीस ठाणे हददीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, यांना पोलीस ठाणे येथे बोलावुन घेवून त्यांना सिध्दरामेश्वर यात्रा व सोलापूर महानगरपालीका निवडणूक २०२५-२०२६ च्या अनुषंगाने शांतता राखण्याबाबत सुचना दिले आहेत, त्यांनी काहीएक गडबड केल्यास त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल बाबत त्यांना समज देण्यात आली आहे.
तसेच मा. मुख्य न्यायदंडाधिकारी सो, जिल्हा न्यायालय सोलापूर यांचेकडून प्राप्त वॉरंट व समन्स याची तात्काळ बजावणी होवुन न्यायालयीन प्रक्रीया जलद गतीने होण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाणे कडुन दिनांक-२०/१२/२०२५ रोजी सकाळी ०५.०० वा. ते ०९.०० वा. पर्यंत डी.बी. अंमलदार यांचेमार्फत विशेष मोहिम राबविण्यात आली व त्यामध्ये १८ बेलेबल व नॉलवेलेबल वारंट बजावणी करण्यात आली तसेच १३ समन्सची बजावणी अवघ्या चार तासातच करण्यात आली आहे.
तसेच फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर कडील गुरनं. ११३२/२०१९ भादवि कलम ३७६ (३) अ.ज.अ.ज. अत्याचार ३(२), (va), ३(२), (५) बा.लै.अ.४,८,१२,४ मधील आरोपी विकास दिगंबर शिंदे यास वरील कलमा मध्ये दोषी धरुन आजन्म करावास व २०,०००/- रु दंडाची शिक्षा झाली आहे. या गुन्ह्याच्या तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सो, विभाग-१ कमलाकर ताकवले, तसेच सरकारी वकिल एस.ए. डोके, कोर्ट पैरवी विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले आहे.
अशाप्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय क्षिरसागर व पथकाने अवघ्या दोन तासात प्रवाशी महिलेचे चोरी गेलेले सोन्याचे दागिने परत मिळवुन देवुन चोरीचा गुन्हा उघड केला आणी पोलीसांबददल त्याचे मनात आत्मविश्वास निर्माण करुन उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याचप्रमाणे न्यायालयीन प्रक्रीया जलद गतीने होण्याकामी अवघ्या चार तसातच सर्व डीबी पथकाने मेहनत घेवुन १८ वॉरंट व १३ समन्सची बजावणी केली आहे.
ही कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार साो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत, दुय्यम पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/प्रविण चुंगे, पोह/बसवेश्वर परीट, पोह/सचिन बाबर, पोना/शिवानंद भिमदे, पोना/सर्जेराव पाटील, पोकों/ज्ञानेश्वर गायकवाड, पोकों/अजय चव्हाण, पोकों/सुरज सोनवलकर, पोकों/महादेव शिंदे, पोकों/अतिश पाटील, पोकों/कृष्णा बडुरे, पोकों/पंकज घाडगे, पोकों/सुधाकर माने, पोकों/विनोद व्हटकर, पोकों/तोसिफ शेख, पोकों/नितीन मोरे, पोकों/शशिकांत दराडे, पोकों/विनोदकुमार पुजारी, पोकों/अमोल खरटमल, यांनी केलेली आहे….



