राहुल शहा यांना कर्ज प्रकरणातील गैरप्रकाराच्या दाखल गुन्ह्यातअटकपूर्व जामीन मंजूर -ॲड.शशी कुलकर्णी

सोलापूर
रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल सुभाष शहा यांना सन 2012 – 2013 मधील कर्ज प्रकरणातील गैरप्रकाराबाबत दाखल गुन्ह्यात, सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
याची थोडक्यात हकीकत की, प्रसाद विलास पवार रा. कुरुणवाडी ता. मोहोळ ,जिल्हा सोलापूर. यांनी फिर्याद दाखल केली की, बँक आणि संचालकांना आर्थिक विवंचना असल्याने त्यांनी फिर्यादीचे वडील व भाऊजीचे नावे कर्ज प्रकरण दाखवून ती रक्कम बँकेचे चेअरमन, सरव्यवस्थापक व शाखा व्यवस्थापक यांनी संगणमताने त्यांच्या स्वतःसाठी वापरली वेळोवेळी सदरचे कर्ज भरतो म्हणून त्यांची फसवणूक केली, त्यामुळे फिर्यादीनी सदर व्यक्तीनी केलेल्या फसवणुकी बाबत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
त्यामध्ये बँकेचे चेअरमन राहुल सुभाष शहा यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे चेअरमन यांनी अँड. शशी कुलकर्णी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन साठी सोलापूर येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्यास जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी तीव्र हरकत घेतली. त्यावर चेअरमन यांच्या तर्फे युक्तिवाद करण्यात आला की, फिर्यादी पक्ष हे बँकेचे कर्जदार असून ते कर्ज थकीत झालेले आहे. मूळ कर्जदारांनी सुमारे 12 वर्षाच्या कालावधीत कर्ज घेतले नसल्याबद्दल तक्रार केली नाही, बँकेने थकीत कर्ज वसुली साठी ची प्रक्रिया जलदगतीने सुरू असल्याने केवळ कर्ज माफ होण्यासाठी फिर्याद दाखल केली आहे.
पोलीस कोठडीतील तपासाची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद करून अर्जदारास जामीन नमिळाल्यास बँकिंग क्षेत्रास धोका निर्माण होऊ शकतो व कर्ज न भरण्याची प्रवृत्ती बळावू शकते अशा प्रकारचा युक्तिवाद झाला.
या पुष्ट्यर्थ उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. न्यायालयाने अर्जदाराच्या वकिलांचा युक्तिवाद तसेच फिर्यादी ची केस कागदपत्रावर आधारित असल्याने आरोपीची पोलीस कोठडीतील तपासाची आवश्यकता नाही, असे निरीक्षण नोंदवून तसेच अर्जदार तपास कामात सहकार्य करण्यास तयार असल्याने अटकपूर्व जामीन मंजूर केला. यात चेअरमन राहुल सुभाष शहा यांच्या वतीने ॲड.शशी कुलकर्णी ॲड.ओंकार बुरकुल ॲड .प्रसाद अग्निहोत्री यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.



