crimeindia- worldmaharashtrapoliticalsocial

प्रतिबंधित मेफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणारा आरोपी अटकेत; १० इंजेक्शन

मोटारसायकल व मोबाईलसह ₹१.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त...

.

 

सोलापूर, दि. १२ :

सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने करमाळा तालुक्यात प्रतिबंधित MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP ची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून १० प्रतिबंधित इंजेक्शने, एक मोटारसायकल व एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ₹१,०६,७२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी प्रतिबंधित औषधांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांच्या पथकाला करमाळा परिसरात एक इसम मोटारसायकलवरून प्रतिबंधित इंजेक्शने विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

 

 

या माहितीच्या आधारे करमाळा-जेऊर रोडवरील सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव शरद विष्णू शिंदे (वय २८, रा. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्याकडील झडतीत Troikaa कंपनीचे MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP चे १० व्हायल, मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीकडे प्रतिबंधित औषधांच्या खरेदी-विक्रीबाबत कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. या औषधांचा बेकायदेशीर व्यापार करून मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १२३/२०२६ अन्वये संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

 

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप,सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे व त्यांच्या पथकातील कर्मचारी मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्राम कंटोळी , व्यंकटेश मोरे,राहुल दोरकर, हरिष थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button