चाकोते नगरमध्ये १५.४३ लाखांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन कामाचे लोकार्पण…

सोलापूर
महाराष्ट्र सुवर्ण जयंती अभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक ११ मधील चाकोते नगर येथे येमूल पिठाची गिरणी ते व्यंकटेश गुंटूर यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्याचे सुमारे रु. १५ लाख ४३ हजार खर्चाचे विकासकाम पूर्ण करण्यात आले. या कामाचे लोकार्पण आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना आमदार विजय देशमुख यांनी नागरिकांना शुद्ध व नियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे सांगितले.

या लोकार्पण सोहळ्यास नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक शेखर इगे, मंडल अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, माजी सैनिक भीमाशंकर लोहार, सतीश भरमशेट्टी, बापू मस्के, नागेश गिरी, राजेश स्वामी, दीपक जाधव, श्रीनिवास सिद्राल, मल्लिनाथ हेबळे, मनोज ओतारी, श्रीशैल हुळ्ळे, मनोज कलशेट्टी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विकासकामामुळे चाकोते नगर परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून स्थानिक नागरिकांनी आमदार विजय देशमुख यांचे आभार व्यक्त केले



