crimemaharashtrapoliticalsocialsolapur

भोंदूबाबा अशोक खरातसह सहा आरोपींना न्यायालयाची नोटीस…

जादूटोण्याची भीती दाखवून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप; जमीन व्यवहारप्रकरणी न्यायालयाचे आदेश

सोलापूर, दि. १८ जुलै

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी दाखल केलेल्या खाजगी फिर्यादीची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ऐश्वर्या सागर जाधव यांच्या न्यायालयाने दखल घेत भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोककुमार खरात यांच्यासह एकूण सहा आरोपींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे संबंधित प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात पोहोचले आहे.
फिर्यादी राजाराम बनसोडे यांनी ॲड. योगेश नागनाथ पवार यांच्यामार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत अशोक खरात व इतर आरोपींनी संगनमत करून जादूटोणा, अंधश्रद्धा आणि भीतीचे वातावरण निर्माण करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

 

 

 

 

फिर्यादीनुसार, बनसोडे यांच्या मालकीची ११ एकर ०८ गुंठे शेतजमीन अत्यल्प किंमतीत हस्तगत करण्यात आली. त्यानंतर त्याच जमिनीची कागदपत्रांमध्ये खोटी फळबागायत दाखवून कोट्यवधी रुपयांना विक्री करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच आरोपी अशोक खरात हे जादूटोणा व अंधश्रद्धेचा आधार घेत शेतकऱ्यांना धमकावत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

या प्रकरणात न्यायालयाने अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नोंदवलेला नसून, कॉग्निझन्स (दखल) घेण्यापूर्वी आरोपींची बाजू ऐकून घेणे आवश्यक असल्याने सर्व सहा आरोपींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची माहिती फिर्यादीचे वकील ॲड. योगेश नागनाथ पवार यांनी दिली.
न्यायालयाच्या या आदेशानंतर आता सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर राहून आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर पुढील न्यायालयीन कार्यवाही होणार आहे. या प्रकरणाकडे जिल्ह्यातील शेतकरी व कायदेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button