india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

आदर,आपुलकी‎ आणि‎ संस्काराचा‎ क्षण:‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराकडून‎ उपमुख्यमंत्री‎ श्रीमती‎ सुनेत्रा‎ वहिनी पवार व‎ खासदार‎ पार्थ‎ दादा पवार‎ यांचा‎ कौटुंबिक‎ सन्मान

नगरसेवक‎ किसन‎ जाधवांनी खासदार‎ पार्थ‎ दादा पवार यांना स्व. अजितदादांच्या‎ जयंतीच्या‎ पार्श्वभूमीवर त्यांचं‎ हुबेहूब‎ अर्धाकृती‎ मूर्ती‎ दिली‎ भेट

 

 

सोलापूर :

 

राजकारणात‎ पक्ष बदलू शकतात, मात्र जिव्हाळ्याचे‎ ऋणानुबंध‎ आणि एखाद्या‎ नेत्याविषयीची‎ निष्ठा‎ कायम राहते,‎ याची‎ प्रचिती‎ रविवारी‎ पुणे‎ येथील ‘जिजाई’ निवासस्थानी‎ आली. ईच्छा‎ भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक तथा‎ सोलापूर महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक २२ चे भाजपा‎ नगरसेवक किसन जाधव‎ यांनी‎ महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री‎ सुनेत्रा वहिनी पवार तसेच राज्यसभा‎ खासदार पार्थ‎ दादा पवार यांची कौटुंबिक‎ सदिच्छा भेट घेत त्यांचा सन्मान‎ केला यावेळी‎ स्वर्गीय तत्कालीन उपमुख्यमंत्री‎ अजितदादा पवार‎ यांच्या‎ जयंतीनिमित्त त्यांच्या हुबेहूब अर्धाकृती मूर्तीची‎ भेट खासदार‎ पार्थ दादा‎ पवार‎ यांना देण्यात‎ आली. हा क्षण‎ उपस्थितांसाठी‎ अत्यंत‎ भावनिक ठरला.‎ नुकत्याच‎ बारामती‎ विधानसभा‎ मतदारसंघाच्या‎ पोटनिवडणुकीत मोठ्या‎ मताधिक्याने‎ विजयी झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा‎ सांभाळणाऱ्या‎ सुनेत्रा‎ वहिनी‎ पवार‎ तसेच राज्यसभेवर‎ बिनविरोध‎ निवड झालेल्या खासदार पार्थ‎ दादा पवार‎ यांचा‎ ईच्छा‎ भगवंताची परिवाराच्या वतीने यथोचित‎ सत्कार‎ करण्यात आला. यावेळी बोलताना‎ नगरसेवक किसन जाधव म्हणाले,‎ आज‎ मी भारतीय‎ जनता‎ पक्षाचा‎ कार्यकर्ता‎ म्हणून जनसेवेचे काम करत‎ असलो, तरी स्वर्गीय‎ अजितदादा पवार‎ यांच्याशी‎ असलेले‎ ऋणानुबंध, त्यांचे मार्गदर्शन आणि‎ विकासाची‎ दूरदृष्टी‎ मी‎ कधीही विसरू‎ शकत नाही.

 

 

 

माझ्या‎ राजकीय प्रवासात‎ अजितदादांनी‎ दिलेला‎ विश्वास‎ आणि‎ पाठिंबा ही माझी कायमची‎ प्रेरणा आहे. ही‎ भेट‎ पूर्णपणे पक्षविरहित‎ असून केवळ‎ आदर, आत्मीयता आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त‎ करणारी‎ आहे. ते‎ पुढे म्हणाले,‎ अजितदादांच्या अकाली‎ निधनाने‎ महाराष्ट्राने एक दूरदृष्टीचा विकासपुरुष गमावला. ती‎ पोकळी कधीही‎ भरून निघणार‎ नाही. मात्र‎ आज महायुतीच्या माध्यमातून‎ उपमुख्यमंत्री‎ म्हणून सुनेत्रा‎ वहिनी‎ पवार‎ आणि राज्यसभेचे‎ खासदार पार्थ दादा‎ पवार‎ यांच्या माध्यमातून अजितदादांचे‎ विकासाचे स्वप्न पुढे‎ नेले‎ जाईल, असा‎ आम्हाला‎ विश्वास आहे.‎ या‎ भेटीत‎ राजकीय सीमांपलीकडे‎ जपलेले‎ कौटुंबिक‎ संबंध,‎ एका नेत्याविषयीची कृतज्ञता‎ आणि विचारांप्रती‎ असलेली निष्ठा यांचे भावनिक‎ दर्शन‎ घडले.

 

 

स्वर्गीय‎ अजितदादांच्या‎ विचारांवर चालत‎ जनसेवेचा वसा जपणाऱ्या किसन‎ जाधव यांच्या या आगळ्यावेगळ्या सन्मानाने उपस्थितांच्या मनात‎ विशेष‎ आदर‎ निर्माण‎ केला. याप्रसंगी‎ युवा नेते चेतन नागेश‎ अण्णा‎ गायकवाड,‎ विनायक शिवशेट्टी, माणिक‎ कांबळे, महादेव राठोड,‎ यल्लप्पा‎ शिवपुरे, वैभव‎ प्रचंडे यांच्यासह ईच्छा भगवंताची परिवाराचे‎ पदाधिकारी‎ व‎ सदस्य आधी‎ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button