पालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांच्या कडून महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाची पाहणी …

सोलापूर :
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय येथे भेट देऊन सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. जिल्हा नियोजन समिती (DPDC) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व्हेटरनरी हॉस्पिटल बांधकामाचे तसेच एनटीपीसी सीएसआर निधीतून सुरू असलेल्या चार पिंजरांच्या बांधकामाचे काम प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

पाहणी दरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांना दोन्ही कामे निश्चित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांनी प्राणीसंग्रहालयातील प्राणीसंवर्धन, प्राण्यांच्या आरोग्य सुविधा आणि पर्यटकांच्या सोयीसुविधा यांना प्राधान्य देऊन कामे जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना केली.

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, उपअभियंता अविनाश वाघमारे, अभियंता चेतन प्रचंडे, अभिजीत बिराजदार ,उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर तसेच प्राणीसंग्रहालयातील अन्य कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्राणीसंग्रहालयाचा विकास आणि प्राण्यांच्या आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी विविध योजनांद्वारे कामे हाती घेतली जात असून, नागरिकांना लवकरच याचा लाभ होणार आहे.



