maharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादीचे संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या माध्यमातून धरमसी लाईन येथे २ कोटी ६० लाखांचा निधी : कामे पूर्णतःवास ! संतोष पवार !

अण्णा बनसोडे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ !
====================
राजन जाधव म्हणाले, चाळीच्या विकासासाठी संतोष भाऊंच्या पाठीशी उभे राहुयात !
====================
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – सोलापूर महानगरपालिकेच्य निवडणुकीला आपण सामोरे जात असताना या भागात संतोष पवार यांच्या माध्यमातून विकास झालेला आज आपण पाहत आहोत, असे विचार विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी मांडले.
धरमसी लाईन येथील विविध विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी रात्री आठ वाजता अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते.

 

 

 

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत १०२ नगरसेवकांचा समावेश असणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार असताना प्रत्येक पक्षाचे बलाबल जास्त असल्याने निवडणूक स्व:बळावर निवडणूक लढविणार आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, असेही अण्णा बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले. यनिमित्ताने जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्यावतीने सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचा क्रेनच्या सहाय्याने सत्कार करून आतषबाजी करण्यात आली.

 

 

सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.आणखी विकास कामांसाठी लागणाऱ्या निधीची कमतरता पडू देणार नाही,अशी ग्वाही अजितदादा यांनी दिली आहे. जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण स्वतः आणि कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान यांनी धरमसी लाईन येथे विविध विकास कामासाठी सुमारे २ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ७ मधील धरमसी लाईन येथील अंतर्गत ड्रेनेज लाईन काम पूर्ण झाले असून यासाठी सुमारे ३५ लाख रुपये निधी मिळाला आहे. याच ठिकाणी धरमसी लाईन येथील अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनसाठी १५ लाखांचा निधी मिळाला आहे.

 

 

 

तसेच या ठिकाणी सभागृहाच्या बांधकामासाठी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच धरमसी लाईन येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी सुमारे ६५ लाख रुपयांचा निधी मिळाला असून काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. धरमसी लाईन येथील अंतर्गत उर्वरित ट्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी २७ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मनोहर नगर अंतर्गत ड्रेनेज लाईनच्या कामासाठी ४८ लाख रुपये मंजूर झाले असून येथीलच अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी आणखी ५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

 

 

 

 

 

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक ७ मधील धरमसी लाईन येथे अंतर्गत सिमेंट रस्त्यासाठी ३० लाख तसेच अंतर्गत उर्वरित पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तसेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून धरमसी येथे सुमारे २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधी मंजूर होऊन जवळपास सव्वा कोटीची कामे पूर्ण झाली असल्याचे संतोष पवार यांनी प्रस्ताविक भाषणात सांगितले. शाम गांगर्डे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
धरमसी लाईन येथील ३० ते ३५ वर्षाची समस्या संतोष पवार यांच्यामुळे सुटली आहे.

 

 

 

 

जवळपास २ हजार मतदार या भागात आहेत. चाळीतील लोकांनी संतोष पवार यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते राजन जाधव यांनी यावेळी बोलताना केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, चित्रा कदम,महेश गाडेकर,प्रमोद भोसले, प्रकाश जाधव, अनिकेत पवार, शाम गांगर्डे, बालाजी मास यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button