crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

BIG Breaking:- पुण्यातील गाजलेल्या शरद मोहोळ खून खटल्यात विशेष सरकारी वकिल म्हणून सोलापूरचे जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांची नियुक्ती….

पुण्यातील कोथरूड भागात राहणारे शरद हिरामण मोहोळ ऊर्फ भाउ यांचा खून दिनांक 05/01/2024 रोजी गोळ्या घालून करण्यात आला होता. तदनंतर अरुण ध्रुपद धुमाळ यांनी कोथरूड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर पोलीसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात शासनाच्या वतीने कामकाज पाहण्यासाठी सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याचा अध्यादेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच काढण्यात आला आहे.

 

 

सदरबाबत सविस्तर हकीकत अशी आहे की, फिर्यादी हे चाळ नं.10/क, दत्त मंदीराजवळ, जयभवानीनगर, कोथरूड, पुणे येथे त्यांची आई नामे पुष्पाबाई हिचेसह राहणेस आहेत. फिर्यादीचे भागात राहणारे शरद हिरामण मोहोळ उर्फ भाउ यांचा ओम केबल नेटवर्क नावाचा व्यवसाय असुन, फिर्यादी हे शरद हिरामण मोहोळ उर्फ भाउ यांचेकडे गेले 15 वर्षापासुन केबलचे ऑफिसमध्ये काम करत आहेत. शरद मोहोळ यांचे नमुद व्यवसायाचे ऑफीस पांडूरंग मंदीराशेजारी, शिवसाईनगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे येथे असून नमूद ठिकाणी राहण्याची सोय देखील आहे. शरदभाऊ हे ऑफिसचे जवळच माऊलीनगर, दगडी खाणीजवळ, सुतारदरा कोथरुड पुणे येथे कुटुंबासह राहण्यास आहेत.

 

 

दिनांक 05/01/2024 रोजी सकाळी 07.00 वा.चे सुमारास फिर्यादी हे नेहमीप्रमाणे केबलचे ऑफीसला जाऊन काम करत होते. त्यावेळी शरद भाऊ ऑफिस येथेच होते. सदर दिवशी शरद भाऊंचा लग्नाचा वाढदिवस होता. सकाळी 11.00 वा. नमूद ऑफिस येथे शरदभाऊंच्या ओळखीचे सागर कडू, पप्पू उत्तेकर असे आले. त्यानंतर 12.00 वा. चे सुमारास मुन्ना ऊर्फ साहील पोळेकर हा ऑफिस येथे आला. त्यानंतर 1.00 वा. चे सुमारास शरद भाऊंचे ओळखीचा प्रमोद साठे हा देखील ऑफिस येथे आला. त्यानंतर सदर ठिकाणी सदरील सर्वांनी मिळून जेवण केले.

 

 

त्यानंतर दुपारी 01.15 वा.चे सुमारास शरदभाऊ हे लग्नाचा वाढदिवस असल्याने दगडूशेठ गणपती मंदीर येथे दर्शन घेणेसाठी जाणेकरीता ऑफिसमधून निघाले सदर वेळी शरदभाऊंसोबत सागर कडू, पप्पू उत्तेकर व मुन्ना ऊर्फ साहील पोळेकर असे ऑफीस येथून चालत त्यांचे घराकडे गाडी लावलेल्या ठिकाणी जात असताना मुन्ना पोळेकर हा शरदभाऊंच्या मागे मागे चालला होता. त्यांचे पाठोपाठ अंदाजे 20 ते 22 मीटर अंतरावर फिर्यादी व प्रमोद साठे असे चालले होते. अंदाजे 1.20 वा. चे सुमारास अचानक फायरिंगचा आवाज आल्याने समोर पाहीले त्यावेळी मुन्ना पोळेकर याने तसेच येवले गल्लीसमोर रोडवर उभे असलेल्या अनोळखी 2 इसमांपैकी एका इसमाने त्यांचेकडील पिस्तूलमधून शरदभाऊंना गोळ्या घालत असल्याचे दिसले, त्यावेळी शरदभाऊ जमिनीवर कोसळले, त्यावेळी पप्पू उत्तेकर हा भाऊंकडे पळाला व सागर कडू हा अनोळखी इसमांना पकडत होता, त्यावेळी फिर्यादी हे पळत भाऊंजवळ गेले. तेव्हा मुन्ना पोळेकर हा पिस्तूलसह प्रमोद साठेच्या दिशेने पळाला. त्यावेळी प्रमोद साठेने शेजारील सायकल उचलुन मुन्ना पोळेकर याचे दिशेने फेकून तो पळू लागला. त्यावेळी प्रमोद साठे याचेवर देखील

मुन्ना पोळेकर याने मागुन फायरिंग केली, प्रमोद साठे हा जीव वाचविण्यासाठी शेजारीच लपला. त्याचवेळी समोर पाहिले असता, अंदाजे 25 ते 30 वयोगटातील अनोळखी दोन इसम त्यापैकी एकाने राखाडी रंगाचा फुल बाह्रांचा शर्ट, डोक्यामध्ये टोपी व काळपट रंगाची पॅन्ट घातली आहे, तसेच दुस-या इसमाने फुल बाहयाचा शर्ट व पॅन्ट घातली आहे, नमूद इसम हे सरळ मागील बाजूस पळुन गेले. त्यावेळी पळताना ‘आम्ही गणेश मारणेची पोर आहोत’ असे ओरडले. सदरवेळी भाऊंच्या तोंडातुन फेस येऊ लागल्याने व छातीतून रक्त येऊ लागल्याने फिर्यादी व इतर साक्षीदार यांनी भाऊंना रिक्षामध्ये बसवून तात्काळ उपचारकामी सहाद्री हॉस्पीटल, वनाज मेट्रो स्टेशनजवळ, कोथरुड, पुणे येथे घेऊन जाऊन अॅडमिट केले. उपचारा दरम्यान शरदभाऊ मयत झाले आहेत.

सदर सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सरकारी वकील यांनी आजपर्यंत १०९ गुन्हेगारांना जन्मठेप तर, 2 आरोपींना फाशीची शिक्षा घेण्यामध्ये यश मिळविले, असून इतर अनेक गुन्हेगारांना १ वर्ष ते २५ वर्षापर्यंत देखील शिक्षा घेण्यामध्ये यश मिळविले आहे, तसेच इतर अनेक गुन्हयामधील आरोपींचे जामीनांचे अर्ज व अटकपूर्व जामीनांचे अर्ज देखील नामंजूर करून घेतले आहेत आणि लातूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे विशेष सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र शासनाने यापूर्वी त्यांची नियुक्ती केलेली होती. तसेच महाराष्ट्र शासनाने अॅड. राजपूत यांची पुण्यातील इतर 2 मोक्काच्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली असून तसेच मा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील काही खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सदर अॅड. राजपूत यांनी जवळपास 29 वर्षे विविध जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये फौजदारी वकील म्हणून काम केले असून, सोलापूर जिल्हयाचे जिल्हा सरकारी वकील म्हणून गेली ७ वर्षे

ते काम करत आहेत. अॅड. राजपूत यांनी सरकारी वकील म्हणून करताना अनेक गुन्हयांमध्ये घेतलेल्या शिक्षांचे प्रमाण अधिक असल्याने आणि त्यांना कामाचा दांडगा अनुभव असल्याने, सदर सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने पुण्यातील शरद मोहोळ यांच्या गाजलेल्या खून खटल्यामध्ये विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button