crimemaharashtrapoliticalsocialsolapur

ऑपरेशन मुस्कान पथकाने लावला हरवलेल्या ३ वर्षाच्या स्वराज च्या पालकांचा शोध घटना फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील….

पालकांनी आपापल्या पाल्याची योग्य ती खबरदारी घ्यावी:- वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने...

सोलापूर

फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील ब्रँड ॲम्बेसिडर हॉटेल येथे एक ३ वर्षाचा चिमुकला बेवारस स्थितीत रडत असताना पोलिसांना आढळून आला. बीट मार्शल पोलीस शिपाई वामने यांनी या बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकांचा शोध लागतो का ? याची सखोल चौकशी केली मात्र त्यांचा शोध लागला नाही .पालकांचा शोध न लागल्याने पोलिसांनी या बालकास फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घेऊन गेले.पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेल्या ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात बीट मार्शल यांनी सुपूर्द केले .
ऑपरेशन मुस्कानच्या पथकाने या बालकास आपल्या ताब्यात घेऊन त्याचा फोटो पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून या बालकाचा फोटो सोशल प्लॅटफॉर्म वर पोलिसांनी प्रसारित केला. या द्वारे स्वराज च्या पालकांचा शोध लागला .त्यानुसार पोलिसांनी स्वराज च्या पालकांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. व त्याचेच हे पालक असल्याची खात्री केली . स्वराजचेच पालक असल्याची खात्री पटताच पोलिसांनी त्याला त्याच्या आई कडे सुपूर्द केले.

ऑपरेशन मुस्कान पथकाने पालकांचा अवघ्या ४ तासात शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सोपवून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले आहे.या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार,पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ.विजय कबाडे व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे. पोलीस आयुक्तलयाच्या वतीने सोलापूरकरांना आवाहन करण्यात येते की स्वराज सारखे बालक कुठे शहरात आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी जेणेकरून अशी मुले सुखरूपरित्या त्यांच्या घरी पोहचतील.तसेच पालकांना आपल्या पाल्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी ….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button