maharashtrapoliticalsocialsolapur
महालक्ष्मी नगर येथील स्थानिक प्रलंबित प्रश्नाबाबत संभाजी आरमारचे आयुक्तांना निवेदन …

सोलापूर
शहरातील प्रभाग ४ व १९ महालक्ष्मी नगर येथे गटार फुटून परिसरातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना या रस्त्यावरून वहिवाट करणे अशक्य झाले आहे.हे पाणी रस्त्यासह स्थानिक नागरिकांच्या घरा – घरात पसरल्याने तेथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सबंधित पालिकेच्या झोन अधिकाऱ्यांना सांगून ही समस्या मार्गी लागत नाहीय.तरी हे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावेत निवेदनाची दखल न घेतली गेल्यास संभाजी आरमार स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा संभाजी आरमारच्या वतीने देण्यात आला आहे .हे निवेदन देतेवेळी संभाजी आरमार संघटनेचे शहर अध्यक्ष सागर ढगे,सचिन गायकवाड,आनंद थिटे,अक्षय बिद्राल, प्रवीण जवळकर , दिंडोरे यांची उपस्थिती होती….