शिवप्रभू प्रतिष्ठान श्री शिवजन्मोत्सव मंडळाची ढोल ताशाच्या निनादात श्री शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना…

शिवप्रभू श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित सिंहासनाधिष्ठित मूर्तीची प्रतिष्ठापना आजरोजी धर्मवीर श्री संभाजी महाराज चौक, पुणे नाका येथे करण्यात आले.
सोलापूर शहरांतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते व शिवभक्तांच्या गर्दीत प्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला.
प्रारंभी ढोल ताशाच्या निनादात, फटाक्याच्या आतिषबाजीत ‘जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय’ च्या जयघोषात श्री शिव आरतीने शिवमूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शिवप्रभू प्रतिष्ठानच्या वतीने भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आले.
प्रस्तावना आशुतोष बरडे, सूत्रसंचालन नितीन रुपनर यांनी तर आभार प्रदर्शन समर्थ बरडे यांनी मानले.
प्रतिष्ठापना पूजन कार्यक्रमास शिवप्रभू प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम बरडे, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना शहरप्रमुख दत्तात्रय वानकर, सत्ताधारी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, बसपा शहराध्यक्ष देवा उघडे, माजी उपमहापौर तथा सत्ताधारी शिवसेना नेते दिलीप कोल्हे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुशिल बंदपट्टे, माजी नगरसेवक तथा भाजपा नेते अनंत जाधव, माजी नगरसेवक विनोद भोसले, पत्रकार महेश हणमे, उद्योजक महेश ठाकरे, उपशहरप्रमुख रेवण पुराणिक, राहुल कालेकर, ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचे संजय पारवे, शिवसेना विभागप्रमुख शिवाजी कोळी, जेष्ठ शिवसैनिक संजय जगताप, आबा सावंत, अण्णा गवळी, सुनील भांगे, इम्तियाज कमिशनर, समीर लोंढे, अमोल भोसले, शरद गुमटे, राजेंद्र बोमरा, प्रशांत कदम, महेश क्षीरसागर, सचिन सुरवसे, दत्तात्रय देशमुख, योगेश क्षीरसागर, सोमनाथ पवार, अजय अमनूर, सतिश पवार, संभाजी कोडगे, आदींसह शिवप्रभू प्रतिष्ठानचे जेष्ठ मंडळीसह उत्सव पदाधिकारी व सदर भागातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.