राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन…
जिल्हाधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी...

सोलापूर –
महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या बाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याची आणि कर्तुत्वाचे अवमूल्य केल्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी तशी पुरावे द्यावेत अन्यथा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे
बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होती
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्र सह देशभरात आपल्या कर्तृत्व आणि सामर्थ्याची गाथा पोहोचणारे असल्यामुळे अनेकांचे प्रेरणास्थानी आहेत.
जगप्रसिद्ध आग्र्याच्या सुटकेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी कितीतरी हुंडी वाटले त्यांनी औरंगजेबाच्या वजीरासह त्याच्या बायकोला लाच दिली मोहसीन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्का असणारे अधिकृत पत्र त्यांनी घेतल्याचं त्याचबरोबर हिरकणी ही एक कथा असून हिरकणीची घटना घडलेलीच नाही महाराजांच्या शिस्तीचा मोठेपणा म्हणून ही गोष्ट रचलेली आहे असे
एका मुलाखतीत वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान पराक्रमी इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगून त्यांची कर्तबदारी कर्तुत्व व पराक्रम कमी करण्याचा प्रयत्न या राहुल सोलापूरकर ने केलेला आहे.
त्यामुळे आमच्यासह तमाम शिवशंभु प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख छत्रगुण माने उपाध्यक्ष सीताराम बाबर फिरोज सय्यद दिलीप निंबाळकर लखन गायकवाड आकाश नाईकवाडी वैभव धुमाळ ज्ञानेश्वर कदम आदि उपस्थित होते