educationalindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांची तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा आमदार विजय देशमुख यांच्या प्रयत्नांना यश.

या निर्णयाने सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.....

सोलापूर

मागील बऱ्याच वर्षांपासून तुकडा बंदी कायद्यामुळे हद्दवाढ भागातील तुकडा प्लॉटची खरेदीविक्री करता येत नहुता. त्यामुळे 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडले असता, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की गुंठेवारी संदर्भात बैठक घेऊन मार्गी लाऊ त्यानुसार दिनांक 9/4/2025 रोजी मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली होती.

 

यात सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील नागरिकांना स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करता येत नाही अथवा घर बांधता येत नाही या मुळे या भागाचा विकास थांबला असल्याने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कडे केली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके व उप भूमी अधीक्षक सावंत हे विडियो कॉन्फ्रेंस द्वारे उपस्थित होते.

महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या निर्णयानुसार आणि आमदार विजय देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे ते शक्य झाले.

त्यामुळे सोलापूर शहारालगतचे शेळगी, दहिटणे, शिवाजीनगर, केगाव, बाळे व कसबे सोलापूर या भागातील नागरिकांना या निर्णयाबद्दल मोठा फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa