india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

हैदराबाद रोड परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी…

सोलापूर

 

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज शहरातील हैदराबाद रोड, विडी घरकुल परिसरातील नाला क्र. २० (पोगुल विहार ते हैदराबाद रोड) तसेच नाला क्र. २१ (हैदराबाद रोड ते आदर्श नगर) या पर्जन्य जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या ठिकाणी सुरू असलेले काम उपरोक्त नमूद सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डीपीआर) राबविण्यात येत असून, त्यामध्ये पर्जन्य जलवाहिनीचे योग्य प्रकारे ट्रेनिंग करणे, काही भागात नाले बंदिस्त करणे, आवश्यक त्या ठिकाणी पाईप टाकणे आदी कामांचा समावेश आहे. सदर पर्जन्य जलवाहिनी ही प्रामुख्याने पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात येते.

 

 

मात्र, शहरातील काही भागात सध्या पर्जन्य जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळून ते वर्षभर (१२ महिने) वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. पर्जन्य जलवाहिनीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळणे हे आरोग्यास अपायकारक असून नियमबाह्य असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, अशा प्रकारामुळे पावसाळ्यात नाले ओव्हरफ्लो होऊन सखल भागांमध्ये पाणी साचणे, आजूबाजूच्या रहिवासी भागात व झोपडपट्टीत पाणी घुसणे यासारख्या समस्या निर्माण होतात, असेही त्यांनी नमूद केले.

 

 

यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता, वेळापत्रक व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. पर्जन्य जलवाहिनी व ड्रेनेज यांची स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्यात यावी, तसेच भविष्यात शहरात पाणी साचण्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, एन्व्हायरोसेफ कन्सल्टंटचे टीम लीडर श्री. गोकुळ चितारी, हर्षवर्धन बुबणे, रेसिडेंट इंजिनिअर चंद्रकांत गुंडे, रोहन तोगरे, रोहित गोडगे, प्रोजेक्ट मॅनेजर सचिन लकारे, साईट इंजिनिअर चरणू शिंदे, राहुल यातकर, मनोज जाधव, सागर करोसेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button