प्रभाग ७ मध्ये शिवसेना–राष्ट्रवादी युतीचा प्रचार वेगात
अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक संपन्न

सोलापूर
प्रभाग ७ मध्ये शिवसेना–राष्ट्रवादी युतीचा प्रचार वेगात
अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक संपन्न
सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युतीच्या प्रचारासाठी थोरला मंगळवेढा तालीम येथील उमेदवार अमोल शिंदे यांच्या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत प्रभाग ७ मधील शिवसेना–राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार अमोल शिंदे, अनिकेत पिसे, मनोरमा सपाटे व मनिषा कणसे यांच्या प्रचाराची दिशा, रणनीती व आगामी कार्यक्रमांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. बूथनिहाय नियोजन, मतदारांशी थेट संपर्क, प्रचारयंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राजन जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उमेदवार अमोल शिंदे, उमेदवार अनिकेत पिसे, तसेच प्रकाश अवस्थी, बाळासाहेब बिडकर, संकेत पिसे, ज्ञानेश्वर सपाटे, मकरंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित नेत्यांनी स्थानिक प्रश्न, विकासात्मक कामे आणि नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेना–राष्ट्रवादी युतीचे चारही उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, येत्या काळात प्रभाग ७ मध्ये युतीचा प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले.



