ब्रेकिंग:- कर्नाटकातील घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने केली अटक एकूण ५ गुन्हे उघडकीस…

सोलापूर
यात थोडक्यात हकीकत अशी की दिनांक २५/०१/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकास सोहेल किरेसुर राहणार बागलकोट कर्नाटक सध्या राहणार रेल्वे स्टेशन सोलापूर यांच्याकडे चोरीचे सोने व त्याने 2023 मध्ये राजस्व नगर विजापूर रोड सोलापूर येथे दिवसा घोरफोडी केल्याची व सध्या हो मैदान जवळील ज्ञान प्रबोधनी शाळेच्या बाजूच्या रोडवर थांबला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली .त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने नाव सोहेल नुरअहमद किरेसुर वय २५ व्यवसाय मजुरी रा.पोस्ट ऑफिसच्या मागे स्टेशन रोड बागलकोट कर्नाटक सध्या रा. सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगेमध्ये ३०.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम १५ हजार रु. मिळून आली .
या बाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवा – उडविची उत्तरे दिली . यानंतर पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवत आरोपी सोहेल नुरअहमद किरेसुर याने जानेवारी २०२५ मध्ये ३ घरफोडी , नोव्हेंबर मध्ये १ घरफोडी , मे २०२३ मध्ये राजस्व नगर मध्ये दिवसा घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. या चोरीतील ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने रेल्वे स्टेशन जवळील दुकान दाराकडे नंतर घेवून जातो म्हणून ठेवल्या असल्याचे सांगून काढून दिले आहेत. या आरोपी कडून ३ लाख १ हजार २०० रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हा आरोपी रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्य करून बंद घराची पाहणी करून घरफोडी चोऱ्या करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगीरी, मा. श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, मा. डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, मा. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, सोलापूर शहर, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. संदिप पाटील, व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, निलोफर तांबोळी, योगेश सावंत, चालक सतिश काटे, बाळासाहेब काळे सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड, यांनी केली आहे….