crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी युवकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर:- ॲड. रितेश थोबडे…

.

 

सोलापूर:-

 

 

अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अभिजीत संतोष काशीद रा. साडे, ता- करमाळा, जि- सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. दिघे साहेब यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, दिनांक 31/7/2025 रोजी पिडिता ही शाळेत गेली असता, शिक्षकांनी तिच्या आईस शाळेत बोलावून घेतले, त्यावेळेस शिक्षकांनी तिच्या आईस सांगितले की, तिच्याकडे आक्षेपार्य वस्तू मिळून आलेली आहे, तिची विश्वासात घेऊन चौकशी करा त्यावेळी पीडिताने तिच्या आईस सांगितले की, तीन ते चार महिने पूर्वी अभिजीत काशीद याने घरात कोन्ही नसताना जबरदस्तीने दुष्कर्म केले व त्यानंतर तिची बदनामी करतो म्हणून चार ते पाच वेळा दुष्कर्म केले. त्यावरून पीडितेच्या आईने करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावर आरोपीस अटक केली होती.आपणास जामीन मिळवा म्हणून आरोपी अभिजीत याने जिल्हा व सत्र न्यायालय, बार्शी येथे अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता .

 

 

 

 

त्यावर आरोपी अभिजीत याने एडवोकेट रितेश थोबडे यांच्यामार्फत जामीन मिळणेसाठी कोल्हापूर उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात, गुन्ह्यात दाखल झालेली फिर्यादी ही उशिराने दाखल झालेली असून गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला आहे, असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 20,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर अर्जदार/आरोपीस जामीन मंजूर केला.

 

 

यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे, ॲड. निखिल पाटील तर सरकारतर्फे ॲड. पी.पी देवकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia