crimemaharashtrapoliticalsocialsolapur

एकाच दिवशी पाच बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश; पाच अल्पवयीन मुलींना दिले संरक्षण

सोलापूर :

 

 

ग्रामीण पोलीस दल, विशेष ज्युवेनाईल पोलीस युनिट आणि बालकल्याण समिती यांच्या संयुक्त समन्वयातून ९ मे रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी होणारे बालविवाह रोखण्यात प्रशासनाला मोठे यश मिळाले. एकाच दिवशी तब्बल पाच अल्पवयीन मुलींना बालविवाहाच्या विळख्यातून मुक्त करून त्यांना बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. समितीने सर्व मुलींना “काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके” घोषित करत त्यांना बालगृहात दाखल करण्याचे आदेश दिले.

 

 

 

मोहोळ पोलीस स्टेशन हद्दीत दोन सख्या अल्पवयीन बहिणींचा विवाह १० मे रोजी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच रात्री ८:५५ वाजता ही माहिती डीवायएसपी तथा स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिटचे प्रमुख संकेत देवळेकर यांना देण्यात आली. अवघ्या एका मिनिटात त्यांनी तातडीने कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी, पोलीस शिपाई उमेश पवार, सिधू थोरात आणि महिला पोलीस शिपाई अश्विनी घोलप यांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही मुलींना ताब्यात घेतले.
त्यानंतर रात्री ९:४५ वाजता वडसांग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे १४ वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती देण्यात आली. अवघ्या दोन मिनिटांत म्हणजे रात्री ९:४७ वाजता त्यांनी पथक रवाना केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हेडकॉन्स्टेबल बसवराज अष्टगी, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अश्विनी गोटे आणि चालक पोलीस शिपाई संतोष कुंभार यांनी संबंधित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.

 

 

 

 

पंढरपूर येथे ७ मे रोजी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र संबंधित मुलगी व पालक समितीसमोर उपस्थित राहत नव्हते. अखेर काल ते समितीसमोर उपस्थित झाल्यानंतर परिस्थितीची गंभीर दखल घेत समितीने पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रांसह महिला पोलीस कर्मचाऱ्याला सोलापूर येथे पाठवून संबंधित मुलीला समितीसमोर सादर केले.

 

 

 

तसेच वैराग पोलीस स्टेशन हद्दीत देखील एका अल्पवयीन मुलीचा होऊ घातलेला विवाह रोखण्यात आला. या संपूर्ण कारवाईत स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिटचे प्रमुख संकेत देवळेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वैरागचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग जाधव यांनीही प्रभावी कारवाई केली.

 

 

 

बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येविरोधात अत्यंत संवेदनशीलता, तत्परता आणि कायदेशीर जबाबदारीने कार्य करणाऱ्या पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिटचे प्रमुख संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बालाजी पवार, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, सचिन माळी आणि प्रतापसिंग जाधव यांचे बालकल्याण समितीच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa