सोलापूर शहरात टप्या टप्याने होणार धान्य वाटप….
अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे ह्यांची धान्य वाटपावर करडी नजर....

सोलापूर /प्रतिनिधी :-
पावसाळा तसेच महापुर सारख्या आपत्ती जनक परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्याचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जून मध्येच देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्यामुळे रेशन कार्डधारकांनी जून मध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्याची धान्य एकत्रित घेऊन जावे असे आवाहनही करण्यात येत आहे. दरम्यान तीन महिन्याचे धान्य एकत्रित मिळणार ही फेक न्यूज प्रचंड व्हायरल होत असल्याचे सोलापूर जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने सांगितले. तीन महिन्याचे धान्य एकदाच नाही पण टप्प्याटप्प्याने मिळणार असून तुलनेत फास्ट देण्याची धोरण राबविले जाणार असल्याचे कळते. तब्बल तीन महिन्याचे मोठ्या प्रमाणात येणारे धान्य साठवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच दुकानदाराकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तीन महिन्याचे धान्य दुकानदाराने एकत्र उचलणे आणि लाभार्थ्याना एकत्रित तीन महिन्याचे धान्य वितरण करणे हे अव्यवहार आहे हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या पुढे तीन म्हणजे धान्य वाटपासाठी एकदाच मागणी देण्याची मागणी बाजूला करून तातडीने धान्य उचलण्याबाबत कळवली आहे.
असे असणार धान्य वाटपाचे नियोजन
सोलापूर जिल्ह्यात जवळपास सर्वच रेशन दुकानदारात जून महिन्याचे धान्य उपलब्ध झालेले आहे.अन्न सप्ताह दिनाच्या औचित्य साधून पहिल्या पंधरवड्यात म्हणजेच दि. सात ते पंधरा तारखेपर्यंत जून महिन्याचे धान्य वितरण केले जाईल. तसेच जुलै ऑगस्ट चे धान्य आवक होताच वीस तारखेच्या पुढे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे धान्य वाटप होईल.
सोलापूर शहरात सर्वच रेशन दुकानात जून महिन्याचे धान्य उपलब्ध आहे,मशीनवर ज्या महिन्याचे डाटा उपलब्ध आहेत त्याच प्रमाणे धान्य वाटप करावे, जुलै-ऑगस्ट महिन्याचे धान्य उपलब्ध होताच पुढील दोन महिन्याचे वाटप करावे. एकंदरीत 30 जून पर्यंत तीनही महिन्याचे धान्य वाटप होणे अपेक्षित आहे….