गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी काढला आदेश कोणता तो पहाच?…

ज्याअर्थी दिनांक १७/०९/२०२४ रोजी सोलापुर शहरातील प्रमुख ०९ मध्यवर्ती मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुका घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन असल्यामुळे मिरवणुकीमुळे मिरवणुक मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. यादरम्यान मिरवणुकीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होवून वाहतुकीची कोंडी होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पार्श्भूमीवर एम.राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चा अधिनियम क्र.२२ चे कलम ३३(१) (ब) अन्वये अधिकारान्वये वाहतुकीच्या मार्गात बदल केला आहे .
दि. १७/०९/२०२४ रोजी सकाळी ०६.०० वा पासुन ते दिनांक १७/०९/२०२४ चे मिरवणुक संपेपर्यंत खालील मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीस जाणेस व येणेस बंद करण्यात येत आहे.
(अपवाद – पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. अॅम्बुलन्स, दवाखान्याचे वाहने, अग्निशामक, संरक्षित व्यक्तीची वाहने व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील अशी वाहने)
बंद करण्यात आलेला मार्ग
१) लोकमान्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक :-
मार्ग:-पत्रा तालीम येथुन सुरुवात-सळई मारुती-गवंडी गल्ली-मल्लीकार्जुन मंदीर-बाळीवेस-तरटी नाका पोलीस चौकी- छ. शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक (प्रभात सिनेमागृहासमोरुन) सरस्वती चौक-लकी चौक-आसार मैदान गणपती घाट २) मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक :-
मार्ग:-दत्त चौक येथून सुरवात-राजवाडे चौक-गंगा विहीर (नवीपेठ)-चौपाड-विठ्ठल मंदीर-बालाजी मंदीर-पंजाब तालीम- मल्लीकार्जुन मंदीर-बाळीवेस-चाटी गल्ली-मंगळवार पेठ पोलीस चौकी-मधला मारुती-माणीक चौक-कसबा पोलीस चौकी-खाटीक मस्जीद-हाजीमाई चौक (दत्त चौक)- गणपती घाट
३) पुर्व विभाग विसर्जन मिरवणुक :-
मार्ग:-कन्ना चौक येथून सुरुवात-जुनी जोडभावी पेठ पोलीस चौकी-वडलकॉड निवास-नेताजी नगर-भुलाभाई चौक-मार्कडेय चौक- जोडबसवण्णा चौक-भद्रावती पेट-सरकारी रुग्णालय-दत्त नगर-कुचन नगर-पद्मशाली चीक जगदंबा चौक-जेलरोड पोलीस ठाणे – किडवाई चौक-बेगम पेठ चौकी-पंचकट्टा-पठाणबागेसमोरुन श्री. सिध्देश्व मंदीर तलावापर्यत. (विष्णु घाट) ४) लष्कर विभाग गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकः-
मार्ग:-नळ बाजार चौक येथून सुरवात-पेंढारी मस्जीद-मुर्गी नाला-सतनाम चौक-कुंभार गल्ली-मौलाली चौक जगदंबा चौक-हुमा मेडिकल-सात रस्ता-शासकिय दुध डेअरी-पत्रकार भवन चौक मार्गे कंबर तलाव. (धर्मवीर संभाजी तलाव.)
५) विजापुर नाका मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकः-
मार्ग:-विजापुर नाका बस स्टॉप येथून सुरुवात-आय.टी.आय. पोलीस चौकी-जुना विजापुर नाका ते कंबर तलावपर्यंत (धर्मवीर संभाजी तलाव.)
६) होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक :- मार्ग:-महावीर चौक-बच्चुवार बंगला पत्रकार भवन-कंबर तलाव
७) घरकुल मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन
मिरवणुक :-
मार्गः-पंचमुखी देवस्थान-वैष्णवी मारुती मंदीर चौक-संभाजी शिंदे हायस्कुल समोरुन-पोषम्मा चौक-महालक्ष्मी चौक-सागर चौक- विजय मारुती चौक-नवनीत चौक-वळसा घेवुन गणेश मंदीर-बी ग्रुप-श्रीनेत्र चौक समोरुन म्हाडा विहीर ८) निलमनगर मध्यवर्ती गणेशोत्सव
विसर्जन मिरवणुक :- मार्ग: दुर्गादेवी मंदौर-निलम नगर-सिध्देश्वर चौक-आमदार दिलीप माने संपर्क कार्यालय-मानाचा शिवगणेश मंदीर- करली चौक- बनशंकरी हॉटेल-पद्मा ट्रेडर्स-गवळी वस्ती-परळकर विहीर ९) बाळे मध्यवर्ती गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक मार्ग बाळे परिसर
पर्यायी मार्ग (फक्त दुचाकी, तीनचाकी, चारचाकी प्रवाशी वाहनांकरिता)
गणेशोत्सव निमित्त विसर्जनाच्या मिरवणुका वरील मार्गाने निघत असल्याने सोलापूर शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
१. विजापुर कडुन पुणे किंवा हैद्राबादकडे जाणाऱ्या वाहनाकरीता मार्ग – नविन विजापुर नाका – नविन बायपास मार्गे केगाव ब्रिज ते पुढे इच्छित स्थळी
२. हैद्राबाद कडुन पुणे किंवा विजापुर कडे जाणाऱ्या वाहनाकरीता मार्ग – नविन हैद्राबाद नाका जुना हैद्राबाद नाका मार्केट यार्ड जुना पूना नाका केगाव बायपास ते पुढे इच्छित
स्थळी ३. विजापुर रोडने रेल्वे स्टेशन व एस.टी. स्टॅन्ड करीता पर्यायी मार्ग
मार्ग विजापुर नाका आय.टी.आय पोलीस चौकी निर्माती विहार लिमयेवाडी चौक सलगरवस्ती पो. स्टे समोर – सलगरवाडी- नागोबा मंदिर रेल्वे स्टेशन तसेच मरीआई चौक शेटेनगर बोगदा निराळेवस्ती हॉटेल अॅम्बेसेडर – एस टी. स्टॅन्ड
४. रेल्वे स्टेशन ते एस.टी. स्टॅन्ड कडे जाण्याकरीता
मार्ग रेल्वे स्टेशन मोदी चौकी रामवाडी बोगदा रामवाडी दवाखाना नागोबा मंदिर मरिआई चौक शेटे नगर बोगदा – निराळे वस्ती हॉटेल अॅम्बेसेडर ते एस.टी. स्टॅन्ड
५. सोलापुर व जुळे सोलापुर शहरात येणाऱ्या चारचाकी प्रवाशी वाहनाकरीता मार्ग – जुना पुना नाका जुना तुळजापुर नाका जुना बोरामणी नाका अशोक चौक मार्गे शहरात येण्यास हा मार्ग
राहील.
६. बार्शी सोलापुर रोड – बाशी कडुन येणारे वाहनाकरीता बार्शी रोड टोलनाका खेड मार्गे केगाव ब्रिज पुणा रोड ते इच्छित स्थळी
७. शहरात जडवाहतुकीस बंदी ही मिरवणुक संपेपर्यंत असेल सदर बंदी मध्ये मार्केट यार्ड चौक जुना बोरामणी नाका – शांती चौक – अक्कलकोट रोड हा मार्ग जड वाहतुकीस येण्याजाण्यास चालु राहील.