सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई सुरूच राहील”:- संतोष पवार{ शहर – जिल्हाध्यक्ष}

सोलापूर
जनतेने दिलेला कौलाचा आम्ही सदैव मनापासून आदर आणि सन्मान करतो.हा कौल आमच्यासाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून सोलापूर शहरातील राष्ट्रवादीच्या सर्वच उमेदवारांना ज्यांनी मतदान स्वरूपात आशिर्वाद दिला.त्या सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपण दाखवलेला विश्वास आणि दिलेली साथ ही भविष्यात जनसेवा करत असताना नेहमीच प्रेरणादायक ठरणार असून कायम स्मरणात राहील.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जनतेसमोर प्रामाणिकपणे विकासाचा अजेंडा मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते माझे सर्व सहकारी यांनी अतिशय प्रामाणिकपणे लढत दिली.या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.राष्ट्रवादीचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे. उर्वरित उमेदवार जरी नगरसेवक म्हणून निवडून आले नसले तरीही आमच्या पक्षाचे उमेदवार जनतेची कामे करत राहतीलचं,यात कसलीचं शंका नाही.
ही निवडणूक शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची नांदी आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई सुरूच राहील.”
सर्व पक्षीय विजयी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन शुभेच्छा !
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलेल्या संपूर्ण पराभवाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वता स्वीकारत आहे …
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
🙏🏻संतोष पवार 🙏🏻



