क्रोमा शोरुम चा गुन्हा उघडकीस आंतरराज्यीय गुन्हेगारास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतलं ताब्यात….
६७ स्मार्टफोन हस्तगत ....

सोलापूर शहरातील, होटगी रोडवरील, टाटा कंपनीचे क्रोमा शोरुम फोडून, एका अज्ञात चोरटयाने शोरुम मधील विविध कंपन्यांचे 78 महागडे मोबाईल फोन व एक क्रोमा शोरुमची काळया रंगाची सॅक (पिशवी) असा एकुण 40,41,220/- (चाळीस लाख एक्क्रेचाळीस हजार दोनशे वीस) रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता. त्याबाबत, होटगी रोड टाटा क्रोमा शोरुमचे मॅनेजर श्री. जितेंद्र दिलीप वाणी, रा. रोहीणी नगर भाग-3, ओम गर्जना चौक, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन, विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर शहर येथे गु.र.नं. 236/2025, भा.ना.सं. 2023 चे कलम 331 (3), 331(4), 305(ए) अन्ध्रये, दिनांक 30/05/2025 रोजी, गुन्हा दाखल आहे.
वपोनि गुन्हे शाखा, श्री. सुनिल दोरगे साहेब, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. सपोनि शैलेश खेडकर यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार-इम्रान जमादार यांनी, घटनास्थळाचे आजू-बाजूचे परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रीक माहितीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. त्याआधारे, सपोनि शैलेश खेडकर व तपास पथकास एका अनोळखी व्यक्तीवर संशय निर्माण झाला. त्याअनुषंगाने, त्या अनोळखी इसमाची अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असताना, तपास पथकास सदरचा आरोपी हा आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून, त्याचेवर, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र अशा विविध राज्यात घरफोडी-चोरीचे व मोबाईल शॉपी फोडून चोरी केले बाबतचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
तसेच, दिनांक 03/06/2025 रोजी, गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेली माहिती व पथकाने संकलित केलेली तांत्रीक माहिती या दोन्ही बार्बीचा सहाय्याने तपास पथकाने, गुन्हा करणारा आरोपी नामे- रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता, वय- 37 वर्षे, सध्या रा. बिहार नगर, सत्मभामा चाळ नं.2, रुम नं. 1/2, टाटा पावर हाऊस जवळ, दिवा (पूर्व) ठाणे, जि. ठाणे राज्य महाराष्ट्र, यास, सोलापूर रेल्मे स्ट्रेशन परिसरात संशयीतरित्या फिरत असताना, त्यास चोरी केलेल्या मोबाईल फोन सह ताब्यात घेतले, त्यावेळी त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक चौकशी केली असता, त्याने वरील प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यामुळे, नमुद आरोपीस सदरचे गुन्ह्यात अटक करणेत आली आहे.
सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने, गुन्हयाचे तपासात, आरोपीकडून, होटगी रोडवरील टाटा क्रोमा शोरुममधुन चोरी केलेले ट्रॅपल, सॅमसंग, वन प्लस, ओप्पो, विवी, नथिंग अशा विविध कंपन्यांचे एकुण 67 महागडे मोबाईल फोन व एक काळया रंगाची सॅक तसेच नमुद आरोपी त्याचा वापरत असलेला मोबाईल फोन असा एकूण 36,33,829/- (छत्तीस लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस) रुपये किंमतीचा मुददेमाल हस्मृगत केला. सदरचा गुन्हा सपोनि श्री. शैलेश खखेडकर व त्यांचे तपास पथकाने अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने, अविरत परिश्रम घेवून उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे / वि.शा., श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर, सपोनि विजय पाटील व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, आबा सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, इब्राहिम शेख, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, शैलेश बुगड, चालक सतिश काटे, शाम सुरवसे तसेच सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.