maharashtrapoliticalsocialsolapur

माघ यात्रेनिमित्त जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल…

सोलापूर.

03 (जिमाका) : माघ शुध्द एकादशी शनिवार दि. 08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, यात्रा कालावधीत पंढरपूर शहर बाहयमार्गावरून जाणा-या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणा-या भाविकांच्या जिवितेला धोका व वाहतुक नियमनास अडथळा होवु नये. यासाठी जड वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करण्यात आला . हा बदल 06 ते 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीपर्यंत राहणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

Version 1.0.0

जड वाहतुकीस बंद ठिकाण शिवाजी चौक (मोहोळ) पर्यायी मार्ग मोहोळ-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा मोहोळ-शेटफळ- टेंभुर्णी- इंदापूर, जड वाहतुकीस बंद ठिकाण शेटफळ चौक (मोहोळ) पर्यायी मार्ग शेटफळ- टेंभुर्णी- इंदापूर किंवा शेटफळ-मोहोळ-कामती- मंगळवेढा-सांगोला. जड वाहतुकीस बंद ठिकाण टाकळी सिंकदर (मोहोळ) पर्यायी मार्ग टाकळी सिकंदर-कुरूल-मोहोळ-शेटफळ- टेंभुर्णी मार्गे किंवा टाकळी सिकंदर-कुरूल-कामती- मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील.
जड वाहतुकीस बंद ठिकाण कुरुल चौक (कामती)- पर्यायी मार्ग कुरूल-कामती-मंगळवेढा-सांगोला किंवा वेणेगाव- शेटफळ- टेभुर्णी, जड वाहतुकीस बंद ठिकाण वेणेगांव फाटा (टेंभुर्णी)- पर्यायी मार्ग वेणेगाव- टेंभुर्णी- इंदापूर किंवा वेणेगाव-शेटफळ- मोहोळ,- कामती- मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण श्री ज्ञानेश्वर चौक (वेळापूर) पर्यायी मार्ग, वेळापूर ते साळमुख- महुद- सांगोला-मंगळवेढा-कामती, किंवा वेळापूर ते अकलूज मार्गे किंवा वेळापूर ते नातेपुते मार्गे इच्छित स्थळी जातील.

माघ यात्रेनिमित्त जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदलड वाहतुकीस बंद ठिकाण साळमुख चौक पर्यायी मार्ग साळमुख ते महुद-सांगोला-मंगळवेढा- कामती मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण महुद चौक (सांगोला) पर्यायी मार्ग महुद- सांगोला-मंगळवेढा-कामती-मोहोळ मार्गे इच्छित स्थळी जातील.जड वाहतुकीस बंद ठिकाण मंगळवेढा-कोल्हापूर बायपास पुलाखाली (सांगोला) पर्यायी मार्ग सांगोला- मंगळवेढा-कामती मोहोळ- शेटफळ- टेंभुर्णी मार्गे इच्छितस्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण मंगळवेढा नाका बायपास (मंगळवेढा) पर्यायी मार्ग मंगळवेढा- कामती- मोहोळ- शेटफळ- टेंभुर्णी किंवा मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील. जड वाहतुकीस बंद ठिकाण भोसे पाटी (करकंब ) पर्यायी मार्ग करकंब-वेणेगाव-टेंभुर्णी-इंदापूर किंवा करकंब-वेणेगाव- शेटफळ- मोहोळ- कामती- मंगळवेढा- सांगोला मार्गे इच्छित स्थळी जातील.

तसेच दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी 00.01 वाजेपासून वेळापूर ते महुद ते सांगोला जाणारी जड वाहतूक दिनांक 26 फेब्रुवारी 2024 च्या आदेशा प्रमाणे बंद राहील. सदरचा आदेश हा दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी 00.01 ते दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. माघवारी कालावधी संपताच पंढरपूर नियमन 2019/19 दिनांक 7 एप्रिल 2019 चा आदेश पुर्ववत अंमलात राहील असेही आदेशा नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button