राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांचा सत्कार …
गुन्हे प्रतिबंधक व गुन्हे गारांवर विशेष लक्ष असेल :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने { फौजदार चावडी पोलीस ठाणे}...

सोलापूर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांची पुणे ग्रामीण येथे सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात उल्लेखनीय कामगिरी केली .गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते . त्यांना पुणे येथे पदोन्नती मिळाल्या नंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचा पदभार कोण स्वीकारणार ? या कडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. शुक्रवारी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला . पदभार स्वीकारल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी त्यांचा भरजरी फेटा परिधान करून पुष्गुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कारा प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे , श्यामराव गांगर्डे , राम पवार ,मकरंद भोगशेट्टी ,यांची उपस्थिती होती.
दरम्यान K CITY NEWS च्या पहिल्याच मुलाखतीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पोलीस खात्यात आपल्याला तब्बल २९ वर्षे झाली असून आता पर्यंत मुंबई पासून सुरुवात होऊन पुढे पुणे शहर ,अहमदनगर , आणि आता सोलापूर या ठिकाणी रुजू झाल्याचे सांगितले.मुंबई आर्थिक गुन्हे शाखा विभागात असताना २७ कोटींचा अपहाराचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळाले . मुंबईत सराईत गुन्हेगारांना जेलमध्ये टाकून समाजात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
या मध्ये प्रामुख्याने सांगायचे झालेच तर कोट्यावधी भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या शतक महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पूर्ण दौऱ्याचे नियोजन आपल्याकडेच होते. दौऱ्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.त्या नियोजनात आपण यशस्वी झालो . तो अनुभव आपल्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने म्हणाले ..
शिर्डी मध्ये बॅक लीफ्टींग चैन मॅचिंग गुन्हे उघडकीस आणायात यश मिळाले . फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत नेहमी शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहू. आंदोलने ,मोर्चे ,विविध सण – उत्सव ,मिरवणुका याचे पूर्वनियोजित नियोजन केले जाईल सण- उत्सव ,मिरवणुका आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष बंदोबस्त वेळोवेळी नेमला जाणार आहे . गुन्हे प्रतिबंधक व रेकॉर्ड वरील आरोपींचा बंदोबस्त करून समाजात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही माने म्हणाले ..
तर या सत्कार समारंभ आयोजित जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…