सोलापूरी चादर,कडक भाकरी,शेंगा चटणी देऊन किसन जाधवांनी इच्छा भगवंताची परिवाराकडून केला मंत्री आदिती तटकरे यांचा विशेष सत्कार …

सोलापूर
सोलापूर -महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण हे गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यानिमित्त ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय येथे इच्छा भगवंताची परिवाराकडून प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव त्यांचा विशेष सत्कार केला यामध्ये जगप्रसिद्ध अस्सल सोलापुरी गुलाबी रंगाचा चादर, गुलाबी रंगाचा शाल,अस्सल सोलापुरी खवय्यांसाठी कुरकुरीत कडक ज्वारीची भाकरी ज्याची जगभर प्रसिद्ध आहे ज्यात अनेक पौष्टिक सत्व आहेत आणि बहुतांश आहार तज्ञांनी या पौष्टिक खाद्याचे कौतुक केले असे पौष्टिक आहार,शेंगा चटणी आणि गुलाबी रंगाचा त्यावर ताई असे नाव असणारं फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, राष्ट्रवादी सहकार सेल कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे, शिवराज जाधव, महेश निकंबे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, इरफान शेख, राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर महिला पदाधिकारी प्रमिला बिराजदार, प्रमिला स्वामी, रुक्मिणी जाधव, संगीता गायकवाड, लक्ष्मी पवार, किरण शिंदे,तुषार जक्का,बबु अड्डेवाले, अमोल जगताप,माणिक कांबळे, वसंत कांबळे, हुलगप्पा शासम, ओंकार हजारे,नागराज गायकवाड, पवन बेरे,श्रीनित नलगोटले आदिंसह इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य यांची उपस्थिती होती.
सोलापूरच्या खाद्य संस्कृतीमध्ये शेंगा चटणी आणि कडक भाकरी याचा वापर हजारो वर्षापासून होत असल्याने अनेक संशोधनपर दाखले उपलब्ध आहेत तसेच जगप्रसिद्ध अस्सल सोलापुरी चादरचा देखील मार्केटिंग होणे गरजेचे आहे ही गरज ओळखून सोलापूरचे नाव ब्रँडिंग व्हावं याच उद्देशाने अस्सल सोलापुरी खाद्य संस्कृती जपली गेली पाहिजे या उद्देशाने महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचा विशेष सन्मान आपण केला असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.