गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर फौजदार चावडी पोलीस ठाण्याची वडार गल्ली बाळीवेस येथे महत्त्वाची बैठक संपन्न…
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिलीप शिंदे यांनी घेतली मंडळांची बैठक...

दिनांक 27 /08/2024 रोजी गोकुळ अष्टमीनिमित्त शहरात मध्यवर्ती ठिकाणी दहीहंडी उत्सव जल्लोष साजरा केला जातो. विविध मंडळाच्या वतीने जल्लोषात मिरवणूक निघतात. याच पार्श्वभूमीवर वडार गल्ली येथील लक्ष्मण महाराज मठात फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिलीप शिंदे यांनी महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीस श्री.महादेव अलकुंटे, श्री.चंद्रशेखर भांडेकर, माजी नगरसेवक श्री.विनायक विटकर, श्री.सुशील बंदपट्टे, श्री.राजू कलकेरी, पोलीस अमलदार श्री.प्रवीण भोसले यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना व.पो.नि श्री.दिलीप शिंदे यांनी आपल्या मनोगतात दहीहंडी उत्सव साजरा होत असताना शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
सर्व मंडळांनी परवानगी घेऊनच दहीहंडी उत्सव साजरा करावा. दहीहंडी मंडळाचा थर चार पेक्षा अधिक नसावा. विनापरवाना कोणीही डिजिटल लावणार नाही . साऊंड सिस्टिम चा आवाज मर्यादित ठेवावा. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचा पालन करावे. रहदारीस अडथळा होईल असे स्टेज किंवा मंडप मारू नये. फटाक्यांची आतिषबाजी करू नये. यासह विविध सूचना दिल्या.
या बैठकीस नागरिकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. ही बैठक यशस्वी करण्यासाठी पोलिस अंमलदार श्री.प्रवीण भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले…