हर हर महादेव च्या जय घोष व विधिवत पूजनेने जेमिनी सांस्कृतिक व क्रिडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महाशिवराञी उत्साहात संपन्न…

सोलापूर –
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. या काळात सर्व लोक शिवभक्तीत मग्न राहतात. त्याच वेळी, देशाभरात शिवरात्रीचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठया भक्ती भावाने पूजा करतात आणि उपवास करतात. त्याचप्रमाणे सोलापूरतील जेमिनी सांस्कृतिक व क्रिडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महाशिवराञी निमित्त हर हर महादेव च्या जयघोषाने मंदिरातील शिवलिंगाची रुद्रपुजा, रूद्राअभिषेक व महापुजा करण्यात आले. पाटील परिवार, जेनुरे परिवार, कोडगी परिवार, मल्लूरे परिवार बोगा परिवार, मेटी परिवार, कलशेट्टी परिवार यांच्यावतीने भक्तिमय वातावरणात महापूजा संपन्न झाले.
यानंतर जेमिनी मातेला पूजन करून सोलापूर शहराला सुखाचे व भरभराटी यावी अशी प्रार्थना करण्यात आल्याची माहिती सुरेश पाटील यांनी दिली. याप्रसंगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सामूहिक पूजन केले. यावेळी मंडळाचे ट्रस्टी बसवराज भाईकट्टी, बसवराज जाटगल, नर्सप्पा मंदकल, बंडप्पा डोळ्ळे, प्रकाश ढंगे, शशिकांत जेनुरे, सायबांना मुडल, विठ्ठल गंजेळी, गंगाराम डोळ्ळे, पवन तगारे आदींनी पूजन केले.
याप्रसंगी विनायक पाटील, नवीन गोटीमुकुल, प्रवीण कैरामकोंडा, म्हाळप्पा कर्ली, सुरेश मंदकल, पवन डोळ्ळे, मुन्ना जेनुरे, सिद्धाराम डोंबे, अप्पी पुजारी, प्रभु कोळी, सिद्राम हळ्ळी अभिषेक कोळी, सिद्धारूढ पुजारी, विजय कोळी आदींची उपस्थिती होती. महापूजनानंतर उपवासाचे फराळ वाटप करण्यात आले.