जिल्हाधिकारी यांनी रास्त भाव धान्य दुकानदाराची यंदाची दिवाळी केली आणखीच गोड !…
वृत्त सविस्तर

सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच रास्त भाव धान्य दुकानदाराचे जून,जुलै, ऑगस्ट तर शहरातील जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर अश्या तीन महिन्याचे कमिशन ऐन दिवाळीत मिळाल्याने सोलापूर जिल्हा संघटनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब ह्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करताना दिवाळीच्या शुभेच्छा ही दिले.ह्यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर ह्यांनी ऐन दिवाळीत दुकानदारांना तीन महिन्याचे कमिशन मिळाल्याने आभार मानले शिवाय शहराप्रमाणे तालुक्यातील दुकानदारांना देखील एकत्र कमिशन मिळण्यासाठी विनंती केली.त्याप्रमाणे संबंधिताना सूचना दिले असून लवकरच तालुक्यातील दुकानदारांना सप्टेंबर व ऑक्टोबर चे कमिशन जमा होणार असून ह्याबाबत संबंधित तालुका निहाय तहसील कार्यालयाची माहिती घेऊन दुकानदारांना कमिशन मिळण्यासाठी जिल्हा पुरवठा कार्यालयात युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. ह्यावेळी जिल्हा संघटनेच्या वतीने श्री संतोषजी सरडे साहेब(जिल्हा पुरवठा अधिकारी) व श्री.ओंकारजी पडोळे साहेब (अन्नधान्य वितरण अधिकारी) ह्यांचे देखील आभार व्यक्त करत दीपावलीच्या शुभेच्छा दिले. ह्यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर जिल्हा उपाध्यक्ष वहाब शेख, उमेश आसादे,पंच कमिटी सदस्य शिवशंकर कोरे,जिल्हा सचिव राज कमटम,ड विभाग अध्यक्ष हर्षल गायकवाड सह जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते.