crimemaharashtrapoliticalsocialsolapur

BIG Breaking:- शहर गुन्हे शाखेकडून जबरी चोरी, मोटार सायकल चोरी सह, एकूण ०५ गुन्हे उघडकीस…

गुन्हे शाखेकडील, पोसई/ मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना मिळालेल्या बातमीवरून, त्यांनी, कंबर तलाव ते जगदिश मंगल कार्यालय सोलापूर अशा जाणाऱ्या रोडवर, इसम नामे प्रदिप अशोक गुरव वय ३६ वर्षे, व्यवसाय मजुरी, राहणार रेवणसिध्देश्वर नगर, बसवेश्वर मठाच्या शेजारी, जुना विजापूर नाका झोपडपट्टी सोलापूर यास ताब्यात घेतले. त्यावेळी, नमूद इसमाचे पाठीवर असलेल्या बेगबाबत त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, त्याने, सदरची बेंग रेल्वे स्टेशन, सोलापूर समोरील रस्त्यावरुन एका माणसाकडुन हिसका मारुन चोरले असल्याचे सांगितले. सदर बॅगेमध्ये नमूद आरोपीने जबरीने चोरलेली रक्कम रूपये ४५,२००/- मिळून आली. त्याबाबत, सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं. ९३४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ थे कलम ३०९ (४) अन्वयेचा वाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

 

 

 

तसेच नमूद इसम नामे प्रदिप गुरव याचे ताब्यातील विना नंबर प्लेट काळया रंगाच्या मोटार सायकल विचारपूस केली असता, त्याने सदर मोटार सायकलबाबत काहीएक उपयुक्त माहिती दिली नाही. सदर मोटार सायकलचे इंजीन व चेसि नंबर बाबत माहिती प्राप्त केली असता, सदरची मोटार सायकल १० वर्षांपूवी सिव्हील हॉस्पीटल येथुन चोरी केली असल्याची माहिती दिली. त्यावरुन, सदर बझार पोलीस ताणे, सोलापूर शहर गु.र.नं. ३१६/२०१४ भा.दं. वि. सं. कलम ३४९ अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

 

 

 

ब) तसेच, पोसई/ मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक असे, पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये ताना चाना चौक ते वल्याळ बगियाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर, सोलापूर या ठिकाणी गस्त करीत असताना, दोन इसम नामे- १) उदयकुमार रामलु कामुर्ती, २) आनंद श्रीरामलु नक्का, यांना विना नंबर प्लेट असलेल्या संशयीत मोटार सायकलसह चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यांनतर, त्यांच्याकडे मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचेकडील मोटार सायकल चोरी केली असल्याबाबत माहिती दिली. त्याबाबत जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं.५४५/२०२४ मा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये दाखल मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

 

 

 

क) त्याचप्रमाणे, पोसई/ मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक असे, पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये, विणकर बाग मध्ये मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर या ठिकाणी गस्त करीत असताना, संशयीत इसम नामे रतन सोमनाथ माटे, वय २७ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा.मट्टी वस्ती, बुध्द विहार, जुना तुळजापूर नाका, सोलापूर यास ताब्यात घेतल, त्यावेळी, त्याचे ताब्यातील मोबाईल बाबत विचारणा केली असता, सदरचा मोबाईल चोरीचा असले बाबत सांगितले. त्यानुसार, जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं. ५५९/२०२४ मा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

 

 

 

ड) त्याचप्रमाणे, पोराई मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना, गोपनिय माहिती प्राप्त झाली की, दोन इसम डोणगाव रोड येथील, मुस्लिम स्मशानभुमीच्या पुढे, जुन्या पत्र्याचे शेडच्या बाहेर थांबलेले असून, त्या शेडमध्ये चोरीच्या टि.व्ही. ठेवल्या आहेत. त्या अनुषंगाने, नमुद ठिकाणी जावुन, दोन इसम नामे- १) विनायक विठ्ठल गायकवाड, २) लखन अशोक गायकवाड यांना ताब्यात घेतले, व्यानंतर, त्यांचेसह सदर पत्र्याचे शेडची पाहणी केली असता, त्यामध्ये, चोरीचे ०७ LED T.V. ठेवलेले दिसुन आले. त्याबाबत, नमुद इसमांकडे अधिक चौकशी केली असता, त्या LED T.V. त्यांनी व त्यांचे आणखी दोन साथीदार नामे रोहित रमेश गायकवाड व राजकुमार उर्फ भोला आनंदया स्वामी यांनी मिळुन, सुमारे दिड वर्षापुर्वी सोलापूर विद्यापिठ जवळ असलेल्या रोडवरील एका टेम्पोमधुन चोरले असल्याची माहिती दिली. त्यानुसार, फौजदार चावशी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुरनं-716-2024 मा.दं. वि.सं. कलम 379 अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे…

 

 

अशा प्रकारे, वरील नमुद ०६ आरोपींकडून, रोख रक्कम, ०२ मोटार सायकल, ०७ LED T.V., ०१ मोबाईल असा एकुण ३,६९,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन, ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे/वि.शा., श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, पो.स.ई./मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, आनंद गडदुरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुड, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button