डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त GK बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे 134 रक्तदात्यांचे रक्तदान…

सोलापूर
भारतीय संविधानाचे जनक बहुजन नायक, थोर विचारवंत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 जयंती निमित्त GK बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने निराळे वस्ती अरविंद पोलीस वसाहत रोड सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रथमतः विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली .तद्नंतर अभिवादन करण्यात आले
या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सवचे अध्यक्ष पृथ्वीजीत सरवदे लहुजी सेनेचे सुरेश आप्पा पाटोळे दलित स्वयंसेवक संघाचे विजयकुमार कांबळे व GK चे संस्थापक गोविंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.
या रक्तदान शिबिरात 134 रक्तदात्यांने सहभाग नोंदवला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्ष पृथ्वीजीत सरवदे, लहुजी शक्ती सेनेचे सुरेश आप्पा पाटोळे, दलित स्वयंसेवक संघचे विजयकुमार कांबळे GK बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे गोविंद कांबळे, सुनील डांगे प्रवीण वाडे, रोहित खिलारे, उत्सव अध्यक्ष सौरभ बोराडे, ऋषिकेश कांबळे, बंटी सोनके, ओंकार कांबळे, अल्ताफ शेख, अरबाज शेख आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते.