solapur

हज यात्रेकरूंसाठी सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इतर रेल्वे गाड्यांना डब्यांची संख्या वाढवा…

एमआयएम पक्षा तर्फे रेल्वे प्रशासनाकडे मागणी...

 

सोलापूर:

दरवर्षी प्रमाणे बकरी सण साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे.बकरी सणाला जग भरातील मुस्लिम बांधव सौदी अरेबिया देशातील मक्का मदीना या ठिकाणी जातात.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शेकडो भाविक यंदाच्या वर्षी बकरी सणासाठी वेगवेगळ्या तारखांना सौदी देशाकडे रवाना होत आहेत.अनेक भाविकांचा मुंबई ते सौदी असा प्रवास सुरू आहे.त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे.उन्हाळी सुट्ट्या असल्याने अनेक रेल्वे गाड्यांना प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे.हज यात्रेकरूना गैरसोय होऊ नये यासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्याना निवेदन देण्यात आले.

 

 

 

मुंबई कडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस किंवा अन्य रेल्वे गाड्या कोच वाढवावे अशी मागणी करण्यात एमआयएमच्या वतीने करण्यात आली.सोलापूर रेल्वे अधिकाऱ्यानी एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिले आहे.मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेस किंवा अन्य रेल्वे गाड्यानं ज्यादा डबे लावण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करणार आहे.त्यामुळे हजयात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय समाप्त होईल.

 

 

 

निवेदन देताना एमआयएम पक्षाचे नगरसेवक गाझी जहागिरदार, वाहेदा भंडाले शौकत पठाण, तौफिक हतुरे, राजा सर बागवान, इलियास शेख, याकूब शेख, इम्रान पठाण,हरीश कुरैशी, अजहर कोर्बु, अशपाक बागवान, अजहर शेख,सचिन कोलते, बशीर शेख, महिबुबअली कुरेशी, अमन दर्जी व इतर
कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button