crimemaharashtrapoliticalsocialsolapur

बांधकाम परवानगी घोटाळा प्रकरणी दोन्ही अभियांत्यांचे दोष मुक्तीचे अर्ज …

 

सोलापूर –

 

 

येथील सोलापूर महानगर पालिका मधील बेकायदेशीर बांधकाम परवानगी बाबत दाखल झालेल्या खटल्यात सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी व कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे या दोघांनी दोषमुक्तीचा अर्ज मुख्य न्याय दांडाधिकारी कोर्ट सोलापूर यांचे कोर्टात दाखल केलेला आहे.
यात हकीकत अशी की,जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत सोलापूर महानगरपलिका बांधकाम परवाना विभाग येथे श्री झाकिरहुसेन नाईकवाडी ( सहायक अभियंता) व श्री श्रीकांत खानापुरे ( कनिष्ठ अभियंता) इतर दोघे कर्मचारी यांनी संगनमताने महापालिकेची व मिळकतदाराची जाणीवपूर्वक त्यांचे फायद्यासाठी फसवणूक केलेली आहे व जे बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचे अधिकार त्यांना नाहीत हे माहीत असूनही त्यांनी ते मंजूर केल्याचे कागदपत्रे तयार करून मिळकतदाराची व महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे व खोटे व बनावट बांधकाम परवाने त्यांना दिले आहेत

 

 

 

 

तसेच सदर बांधकाम परवाने मंजूर केल्या बाबतचे आवक रजिस्टर व नमूद अनधिकृत बांधकाम परवाना क्र ०१ते ९६ संदर्भात मंजूर करण्यात आलेल्या संदर्भाने सर्व दस्त हे जाणीवपूर्वक नाश अथवा त्याची विल्हेवाट अथवा ते कोठेतरी स्थलांतरित केले व महापालिकेकडे केवळ कमी विकास शुल्क जमा करण्यास लावून महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे म्हणून महापालिका उपअभियंताश्री मठपती यांनी वरील मजकुराचा गुन्हा दाखल केला.

 

 

त्यानंतर पोलिसांनी तपास करून मुख्य न्यायदांडाधिकारी कोर्टात आरोप पत्र दाखल केले. त्या आरोप पत्राची दखल घेऊन आरोपींना न्यायालयात हजर राहणे बाबत सम्मान्स काढले होते. त्याप्रमाणे सहाय्यक अभियंता झाकीर हुसेन नाईकवाडी व कनिष्ठ अभियंता श्रीकांत खानापुरे मेहरबान कोर्टासमोर हजर झाले. व त्यांनी सदर खटल्यातून आपल्याला दोष मुक्त करावे असा विनंती अर्ज न्यायालयासमोर सादर केला त्यामध्ये त्यांनी असे मुद्दे मांडले की प्रकरणात फसवणूक,बनावट कागदपत्रे किंवा आर्थिक नुकसान याबाबत कोणताही स्पष्ट पुरावा नाही. त्यामुळे खटल्यातून मुक्तता करावी.

 

 

 

अशा प्रकारचा विनंती अर्ज न्यायालयासमोर सादर केला. मा. न्यायालयाने त्या अर्जावर सरकारी वकील व तपास अधिकारी यांनी 30 जुलै 2025 पावेतो म्हणणे दाखल करावे असा आदेश पारित केला.या प्रकरणाची पुढील सुनावणी ही दिनांक 30 /7/ 2025 रोजी नेमलेली आहे. सदर प्रकरणात अभियंता आरोपीतर्फे ऍड. शशी कुलकर्णी,
ऍड. देवदत्त बोरगावकर, ऍड. रणजीत चौधरी,ऍड. प्रणव उपाध्ये,यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa