छत्रपती शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्याचा वारसा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी चालविला-प्रा डॉ चंद्रकांत चव्हाण….

सोलापूर –
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या त्री शताब्दी जन्मोत्सवानिमित्त सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कल्याणकारी राज्याच्या वसा अहिल्यादेवींनी समर्थपणे चालविला असे मत व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक अत्यंत कुशल प्रशासक, कणखर राज्यकर्त्या होत्या असे सांगून त्यांनी आपल्या राज्यातील रयतेच्या कल्याणाकरिता राबविलेल्या अनेक योजनाची माहिती दिली. त्याबरोबरच अहिल्यादेवींनी देशभर केलेल्या धर्मकार्यांचा उल्लेख त्यांनी व्याख्यानात केला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यात अनेक दुःखे आलेली असताना ती मागे ठेवून आपले राज्य शिवास अर्पण करून त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे होळकरांचे राज्य चालविले असे मत प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनानिमित्त डाॅ चंद्रकांत चव्हाण यांचे व्याख्यान जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपट व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी राष्ट्रवादी भवन कार्यालयात आयोजित केले होते.
सुरुवातीला प्रमुख पाहुणे प्राध्यापक डाॅ चंद्रकांत चव्हाण अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके जेष्ठ नेते बाबाभाई सालार यांच्या शुभहस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .येळकोट येळकोट जय मल्हार , पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अश्या घोषणांनी राष्ट्रवादी भवन कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.
प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ .चंद्रकांत चव्हाण यांचा शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
प्रथम चित्रपट व सांस्कृतिक सेल विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर आभार जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले यांनी केले .
यावेळी व्यासपीठावर प्रदेश जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सरचिटणीस फारुक मटके,कुमार जंगडेकर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले जेष्ठ नेते बाबाभाई सालार सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, युवक अध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख शहर उपाध्यक्ष शकील शेख OBC सेल विभाग अध्यक्ष अनिल छत्रबंद OBC सेल कार्याध्यक्ष आयुब शेख अल्पसंख्याक जनरल सेक्रेटरी मोईज मुल्ला,दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम. एम. इटकळे, उत्तर विधानसभा अध्यक्ष ॲड.अमोल कोटी वाले , प्रकाश झाडबुके , सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे , सागर गव्हाणे , शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादी राजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, संतोष वेळापुरे , शामराव गांगर्डे , नाम पवार , बाबुराव इरवडकर, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे , कार्याध्यक्ष संजय सांगळे, प्रज्ञासागर गायकवाड अल्पसंख्यांक मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार यांची उपस्थिती होती.