socialsolapur

लाडकी बहीण योजना;लाभार्थ्यांनी बँकेविषयी तक्रार असेल तर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद…

सोलापूर:

HTML img Tag Simply Easy Learning

– जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 14 ऑगस्ट 2024 पासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु काही बँकांकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे विविध कारणास्तव परस्पर कपात केले जात आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांना संबंधित लाभार्थ्याचे बँक खात्यावरील पैसे कपात करू नये याबाबत सुचित करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लाभार्थ्यांचे बँक खात्यातून पैसे कपात झाले असतील तसेच या योजनेच्या अनुषंगाने बँकेशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर प्रत्येक तालुका निहाय हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यावर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तालुका निहाय संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून हेल्पलाईन क्रमांक खालील प्रमाणे देण्यात येत आहेत….

*माढा* – संरक्षण अधिकारी श्रीमती उज्वला कापसे मो.नं. 8308273114, विस्तार अधिकारी बंडु खेताडे मो.नं.7030384711, विस्तार अधिकारी आकाश कोकाटे मो.नं. 7030384711

*बार्शी -* विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले मो.नं.8208213921, विस्तार अधिकारी सुरज काटकर मो.नं. 8208213921
उत्तर सोलापूर- संरक्षण अधिकारी अविनाश जेठीयाद मो.नं. 8698475808, विस्तार अधिकारी रवि पाटील मो.नं.7588046259

*मोहोळ –* संरक्षण अधिकारी उज्वला कापसे मो.नं.8308273114, विस्तार अधिकारी शिलादेवी दाडे मो.नं.9975567732

*सांगोला-* संरक्षण अधिकारी सचिन चव्हाण मो.नं.7875693241, विस्तार अधिकारी प्रविण गायकवाड मो.नं.8421910928

*करमाळा –* संरक्षण अधिकारी मिथुन पवार मो.नं. 9527341147, विस्तार अधिकारी संदिप रणदिवे मो.नं.7387294383

*माळशिरस –* संरक्षण अधिकारी श्रीमती पी.एस.वावरे मो.नं.8788158230, विस्तार अधिकारी स्वप्नील वाघमारे मो.नं.9637983739

*पंढरपूर -* विस्तार अधिकारी अनंत शिंदे मो.नं.9049529797, विस्तार अधिकारी पांडुरंग कुंभार मो.नं.8275303173

*दक्षिण सोलापूर –* विस्तार अधिकारी ऋषीकेश जाधव मो.नं.8600798899, संरक्षण अधिकारी मिलिंद घाडगे मो.नं.9049113282

*अक्कलकोट –* विस्तार अधिकारी मृणाली शिंदे मो.नं.9420358355, संरक्षण अधिकारी एस.एस.कलशेट्टी मो.नं.9665673745

*मंगळवेढा –* पर्यवेशीका श्रीमती अनुराधा शिंदे मो.नं.9423591049, संरक्षण अधिकारी आर.आय.विजापूर मो.नं.9326527044.

तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँकेशी संबंधित पैसे कपात व अन्य कोणतीही तक्रार असेल तर उपरोक्त संपर्क अधिकारी यांच्याशी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button